News

सध्या राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची पिके जळून जात आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. आता महावितरणचे कार्यकारी संचालक विजय सिंघल यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Updated on 28 November, 2022 1:01 PM IST

सध्या राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची पिके जळून जात आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. आता महावितरणचे कार्यकारी संचालक विजय सिंघल यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

ते म्हणाले, महावितरणची (Mahavitaran) आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे वसुलीशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट करीत चालू बिल (Electricity Bill) न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीजजोड (Power Supply Cut Off) कापावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

यामुळे आता शेतकऱ्यांचे टेन्शन अजूनच वाढणार आहे. कंपनीची आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची आहे. कंपनीवर प्रचंड कर्ज झाले आहे. नवीन कायद्यांमुळे कर्ज घेण्याची क्षमताही कमी झाली आहे, असे यावेळी सांगण्यात आले आहे.

चीनमध्ये दुध ११४ रुपये, नेपाळमध्ये ९०, पाकिस्तानमध्ये १५० रुपये लिटर भारतातच सर्वात कमी दर..

देवेंद्र फडणवीस यांनी सध्याचे बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित न करण्याची सूचना केली. त्यांना वगळून इतर कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करा. बिल न भरणाऱ्यांची वीज कापण्याशिवाय आता कोणताच पर्याय नाही, असे सिंघल म्हणाले. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही.

उत्तर प्रदेशमध्ये मोफत मिळणार देशी गाई, संभाळण्यासाठी 900 रुपयेही देणार..

नागपुरात सिंघल यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी वीजबिलाची थकीत वसुली हाच मुद्दा या बैठकीच्या अजेंड्यावर होता, यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरी यासाठी आक्रमक झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:
'वाघ आहे की शेळ्या दाखवू देऊ, गेल्यावर्षीचा हिशेब घेतल्याशिवाय राहणार नाही'
उत्तर प्रदेशमध्ये मोफत मिळणार देशी गाई, संभाळण्यासाठी 900 रुपयेही देणार..
चीनमध्ये दुध ११४ रुपये, नेपाळमध्ये ९०, पाकिस्तानमध्ये १५० रुपये लिटर भारतातच सर्वात कमी दर..

English Summary: electricity farmers not pay current bills cut off director Mahavitaran
Published on: 28 November 2022, 01:01 IST