News

महावितरणची सक्तीची वीजबिल वसुली सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. शेतकरी बांधव ऐन रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीवेळी घेतला गेलेला हा निर्णय अमानुष असल्याचा सांगत आहे, तर महावितरण वीज बिल वसुली केल्याशिवाय महावितरण चालूच शकत नाही अशा आडमुठ्या वागणुकीवर ठाम आहे. यामुळेच परिस्थिती नसताना देखील उसनवारीने पैसे घेऊन अनेक शेतकरी बांधवांनी शेतीपंपाचे थकीत वीज बिल भरणा केले आहे, सोलापूर जिल्ह्यातही अनेक शेतकऱ्यांनी थकीत वीजबिल भरणा केल्याचे समोर आले आहे.

Updated on 06 March, 2022 5:13 PM IST

असे झाले असले तरी अद्यापही माडा तालुक्यात सुरळीत विद्युत पुरवठा होत नसल्याच्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. म्हणुनच संभाजी ब्रिगेडने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा सक्तीची विज'भरणे' या कारणावरून रोखला होता. भरणे मामांचा ताफा टेंभुर्णी जवळ संभाजी ब्रिगेडने रोखला, आणि मामांनी ताबडतोब यावर तोडगा देखील काढला. मामांनी सांगितले की, शेतकऱ्यांची परिस्थिती नाजूक आहे तसेच वाढती थकबाकी हा केवळ जिल्ह्याचाच विषय आहे असं नाही तर संपूर्ण राज्याचा विषय आहे, त्यामुळे सक्तीची वीज बिल वसुली करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने वीजबिल वसुली करावी अशी मागणी कॅबिनेटची बैठकित करणार अस देखील मामांनी नमूद केले.

भरणे मामांचा 'हा' तोडगा- खरीप हंगामात झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मोठे वाटोळे झाले आहे, तसेच महावितरण देखील वाढत्या थकबाकीमुळे डबघाईला जात असल्याचे चित्र आहे. महावितरण आणि शेतकरी आर्थिक टंचाईत आहेत मात्र असे असले तरी सक्तीची वीजबिल वसुली अन्यायकारक आहे. म्हणून वीज बिल भरणा टप्प्याटप्प्याने होणे अनिवार्य आहे. महावितरणने शेतकऱ्यांचा आणि शेतकरी राजाने महावितरणचा विचार केला तर हा प्रश्न निकाली निघू शकतो. याव्यतिरिक्त मंगळवारी भरणे मामा कॅबिनेटमध्ये वीज बिल भरणा वर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करतील असे देखील त्यांनी नमूद केले.

आता भरणे मामाचा हा तोडगा केव्हा लागू होईल आणि सोलापूर जिल्ह्यासाठीचं लागू केला जाईल की संपूर्ण राज्यात लागू होईल हे तर येणारा काळच सांगेल. मात्र एवढे नक्की पालकमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे शेतकरी राजाला तूर्तास बरं वाटलं आणि जर पालकमंत्र्यांचा हा तोडगा महावितरणने ऐकला तर कदाचित एकदम शेतकऱ्यांवर येणारे ओझे टप्प्याटप्प्याने येईल.

English Summary: electricity bill due but msedcl now in action and farmers are in great trouble
Published on: 06 March 2022, 05:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)