News

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. हे संकट म्हणजे शेतकऱ्यांची विजतोडणी सध्या सुरु आहे. यामुळे अनेकांची पिके जळू लागली आहेत. असे असताना देखील ही कारवाई सुरूच आहे. आता सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या सुचक विधानामुळे शेतकऱ्यांची पुन्हा धाकधूक वाढलेली आहे.

Updated on 30 January, 2022 4:48 PM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. हे संकट म्हणजे शेतकऱ्यांची विजतोडणी सध्या सुरु आहे. यामुळे अनेकांची पिके जळू लागली आहेत. असे असताना देखील ही कारवाई सुरूच आहे. आता सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या सुचक विधानामुळे शेतकऱ्यांची पुन्हा धाकधूक वाढलेली आहे. सातारा येथील एका आयोजित कार्यक्रमात त्यांनी ऊस बिलातून वीजबिल वसुली हा शेवटचा पर्याय आहे. शेतकऱ्यांची याबाबत तयारी असेल तर तो अधिकार शेतकऱ्यांना आणि संबंधित संस्थेला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे येणाऱ्या काळात तसा निर्णय झाला तर वेगळे वाटायला नको. यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वीजबिल वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला तीव्र विरोध होत असल्याने अद्यापपर्यंत अशा प्रकारे अडवणूक करुन वीजबिल वसुली झालेली नाही. अनेकांनी याबाबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, यामुळे तो निर्णय तसाच राहिला. असे असतले तरी भविष्यात गरज पडली तर अशाप्रकारे वीजबिलाची वसुलीही होऊ शकते असेच संकेत आता सहकार मंत्र्यांनी दिले आहेत. सातारा येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यक्रमा दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलेले आहे.

शेतकरी सध्या सगळ्या बाजूने अडचणीत सापडला आहे. अवेळी पाऊस, गारपीट यामुळे त्याची अवस्था वाईट आहे, अशातच असा निर्णय झाला तर शेतकऱ्यांचा मोठा उद्रेक होईल आणि यामुळे सरकार पुढील अडचणी वाढणार आहेत. तसेच राज्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा विद्युत पुरवठा हा खंडीतच करता येत नाही. महावितरण मात्र, शेतकऱ्यांना पूर्वकल्पना न देताच विद्युत पुरवठा खंडीत करीत आहे. यामुळे हाताला आलेली उभी पिके जळू लागली आहेत. यामुळे शेतकरी नाराज आहे.

तसेच ऊस बिलातून वीजबिल वसुली झाली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता. यामुळे तेव्हा हा निर्णय मागे पडला. आता थकीत वीजबिल वसुली झाली नाही तर ऊसाच्या बिलातूनच वसुली हाच पर्याय आहे. मात्र, यासंबंधी शेतकऱ्यांची तक्रार काय आहे हे पाहूनही निर्णय होणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. तसेच ऊसबिलातून वसुली होणारच असल्याचे संकेत त्यांनी अस्पष्ट दिले आहेत. यामुळे शेतकरी वर्गात याची चर्चा सुरु आहे.

English Summary: electricity bill be recovered from sugarcane bill? Co-operation minister's big statement, farmers' tension increased ..
Published on: 30 January 2022, 04:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)