News

पाच राज्यात निवडणूक होणार आहे. यासाठी जवळपास १६ कोटी लोक मतदान करणार आहेत. यात पहिल्यादाच ६० लाख युवा मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. पाच राज्यात ६७९ जागांवर मतदान होणार आहे.

Updated on 09 October, 2023 1:18 PM IST

New Delhi : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोराममधील विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय, अरुण गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

या पाच राज्यात निवडणूक होणार आहे. यासाठी जवळपास १६ कोटी लोक मतदान करणार आहेत. यात पहिल्यादाच ६० लाख युवा मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. पाच राज्यात ६७९ जागांवर मतदान होणार आहे.

निवडणुकीत मतदानासाठी नोंदणी करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. आदिवासी भागात PVTG मतदान केंद्राची सोय करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना व्होट फ्रॉम होम करता येणार आहे. यामुळे या ५ राज्यात कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते.


कोणत्या राज्यात किती विधानसभेच्या जागा
मध्यप्रदेश - २३०
राजस्थान - २००
छत्तीसगड - ९०
तेलंगना - १९९
मिझोराम - ४०

कोणत्या तारखेला होणार मतदान
मिझोराम - ७ नोव्हेंबरला
छत्तीसगड - ७ आणि १७ नोव्हेंबर
मध्यप्रदेश - १७ नोव्हेंबर
तेलंगना - ३० नोव्हेंबर
राजस्थान - २३ नोव्हेंबर

English Summary: Election programs announced in five states when will the voting be held election update
Published on: 09 October 2023, 01:18 IST