News

मुंबई: राज्यातील विविध 24 जिल्ह्यांमधील 557 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 82 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी 24 मार्च 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.

Updated on 22 February, 2019 8:08 AM IST


मुंबई:
राज्यातील विविध 24 जिल्ह्यांमधील 557 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 82 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी 24 मार्च 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, एप्रिल 2019 ते जून 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांबरोबरच थेट सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान होईल. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 5 ते 9मार्च 2019 या कालावधीत स्वीकारले जातील. त्यांची छाननी 11 मार्च 2019 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 13 मार्च 2019 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल.

मतदान 24 मार्च 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 25 मार्च 2019 रोजी होईल.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:

  • ठाणे-3
  • रायगड- 20
  • रत्नागिरी- 11
  • सिंधुदुर्ग- 4
  • नाशिक- 48
  • धुळे- 18
  • जळगाव- 12
  • अहमदगनर- 3
  • नंदुरबार- 5
  • पुणे- 20
  • सोलापूर- 8
  • सातारा- 44
  • कोल्हापूर- 3
  • औरंगाबाद- 3
  • उस्मानाबाद- 2
  • परभणी- 1
  • अमरावती- 1
  • अकोला- 14
  • वाशिम-32
  • बुलढाणा- 2
  • नागपूर- 2
  • वर्धा- 298
  • चंद्रपूर- 1
  • गडचिरोली- 2
  • एकूण- 557.

पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा:

  • ठाणे- 1
  • रायगड-15
  • सिंधुदुर्ग- 3
  • नाशिक- 4
  • धुळे- 1
  • जळगाव- 2 
  • अहमदगनर- 4
  • नंदुरबार- 1
  • पुणे- 3
  • सोलापूर- 3
  • सातारा- 6
  • सांगली- 2 
  • कोल्हापूर- 8
  • बीड- 1
  • नांदेड- 6
  • उस्मानाबाद- 2
  • परभणी- 2 
  • अकोला- 3
  • यवतमाळ- 1 
  • वाशिम- 6
  • बुलढाणा- 2
  • नागपूर- 6 
  • एकूण- 82.
English Summary: Election for 557 Gram Panchayats on 24th March
Published on: 22 February 2019, 08:00 IST