मुंबई: बहुमतातील शिंदे-फडणवीस सरकार सुसाट चालले आहे. मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही तरी ही, राज्याचे प्रशासकीय कामकाज सुरळीत चालू आहे, असे दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde and Devendra Fadnavis) सरकारच्या शपथविधीच्या पहिल्या 24 दिवसांत तब्बल 538 जीआर जारी करण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळ अस्तित्वात नसल्याने ते प्रशासकीय पातळीवरच जीआर (GR) काढले गेले आहेत. पहिल्या 24 दिवसांतच तब्बल 538 जीआर काढण्यात आलेत. हा वेग पाहता दिवसाकाठी 22 तर कार्यालयीन वेळ गृहीत धरली तर प्रत्येक तासाला 2.5 जीआर निघालेत आहेत.
या विभागात सर्वाधिक जीआर
सर्वाधिक जीआर हे सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, सामान्य प्रशासन विभाग, जलसंपदा विभाग, महसूल आणि वन विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे आहेत.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे 110 जणांचा मृत्यू, 28 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा
सर्वोच्च GR : पाच खाती
१. सार्वजनिक आरोग्य 73
२. पाणीपुरवठा आणि स्वच्छता 68
३. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग 43
४. सामान्य प्रशासन विभाग 34
५. जलसंपदा विभाग, महसूल आणि वन विभाग आणि वैद्यकीय शिक्षण आणि औषधनिर्माण (3) प्रत्येकी 24
Petrol-Diesel: पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठे बदल; जाणून घ्या आजचे नवीन दर
१. ग्रामविकास विभाग : 22
२. कृषी, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय: 22
३. उच्च आणि तंत्रशिक्षण: 21
४. गृह विभाग : २०
५. आदिवासी विभाग : १९
६. मृद आणि जलसंधारण: 17 -सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य: 14
७. सहकारिता, विपणन आणि वस्त्रोद्योग: 13
८. सार्वजनिक कामे :13
८. कौशल्य विकास आणि उद्योजकता: 12
९. महिला व बालकल्याण विभाग : 10
Fertilizer news; शेतकऱ्यांनो सावधान! खतामध्ये केली चक्क मिठाची भेसळ, चोरांनो कुठं फेडचाल हे पाप..
Published on: 26 July 2022, 10:31 IST