News

विजेचे संकटच ओढवले आहे. विजांच्या कडकडाटासह पडणाऱ्या पावसामुळे विदर्भावर संकटांची मालिकाच सुरु झाली आहे.

Updated on 24 June, 2022 3:56 PM IST

राज्यातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीकामाची लगबग वाढली आहे . अशातच अचानक येणाऱ्या पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शेतकरी झाडाचा आसरा घेत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चार शेतकरी बंधूंना झाडाचा आसरा घेणं चांगलाच महागात पडलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पळशी झाशी गाव शिवारात अंगावर वीज पडून संजय उत्तम मारोडे आणि रवि संजय भालतडक या दोन शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे.

तर मंगेश मनोहर बाखरे आणि बंडु मधुकर मारोडे हे दोन शेतकरी जखमी झाले आहेत. विदर्भावर विजेचे संकटच ओढवले आहे. विजांच्या कडकडाटासह पडणाऱ्या पावसामुळे विदर्भावर संकटांची मालिकाच सुरु झाली आहे. एकाच दिवशी वेगवगेळ्या ठिकाणी वीज पडून आठ शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. त्यात नागपूर, गोंदिया, आणि बुलढाणा जिल्ह्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला आहे.

नागपूर मधील वंदना अनिल वरठी आणि प्रफुल्ल दीपक नायक. गोंदिया मधील पवनकुमार मनोहर गुढेवार, जोशीराम झगडू उईके. गडचिरोली मधील रामाया मोंडी सल्लावार, अमरावती मधील रोशनी नरेश मंडवे तर बुलढाणा जिल्ह्यातील संजय उत्तम मारोडे आणि रवि संजय भालतडक या शेतकरी बंधूनी आपला जीव गमावला आहे.

झाडाचा आसरा घेणं पडलं महागात - बुलढाणा
विहिरीचे खोदकाम करणारे शेतमजूर संजय उत्तम मारोडे व रवि संजय भालतडक या दोघांच्या अंगावर वीज कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या घटनेत मंगेश बारब्दे व नंदू मधुकर मारोडे हे दोन शेतकरी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात नेण्यात आले आहे.

शेती करा आणि मोठ्या कमाईचे 'हे' उद्योग गावात सुरू करा, मिळेल बक्कळ नफा

या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावर यांनी घटनास्थळी प्रभारी मंडळ अधिकारी जी. आर. राऊत, तलाठी डी. एच. जाधव यांना पाठविले. यावेळी महसुल कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करुन तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांना अहवाल सादर केला. शेतकरी बंधूनी पावसात झाडाचा आसरा घेणं टाळावं. सध्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या:
आमदार हॉटेलमध्ये मजेत, कांदा प्रश्नावरून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत मात्र पाणी
7th Pay Commition Big Update: आता डीए सोबतच घरभाडे भत्त्यात(HRA) होणार वाढ, वाचा सविस्तर माहिती

English Summary: Eight farmers were killed on the same day
Published on: 24 June 2022, 03:56 IST