महाराष्ट्र मध्ये कृषी पंप थकबाकीहा महावितरण पुढील फार मोठा प्रश्न आहे.यासाठी महावितरणनेकृषी पंप विज जोडणी धोरण 2020 जाहीरकेले.त्याची मुदत आता 31 मार्चला संपणार असूनया योजनेचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा.
मध्यंतरी महावितरणने कडक पावले उचलत थकबाकीदार शेतकर्यांची वीज जोडणी खंडित करण्याची मोहीम हाती घेतली होती.त्यामुळे या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतलाहोता.हे प्रकरण विधानसभेत देखील गाजले होते. तूर्तास आता तीन महिन्यांपर्यंत थकबाकी दार कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन स्वतःला थकबाकी मुक्त केले आहे. जर या योजनेमध्ये सातारा जिल्ह्याचा विचार केला तर हजार पेक्षा जास्त शेतकरी थकबाकी मुक्त झाले आहेत.
कृषी पंप थकबाकी तील सातारा जिल्ह्यातील स्थिती
सातारा जिल्ह्यामध्ये एक लाख 83 हजार 973 शेतकरी हे थकबाकीदार होते. या शेतकऱ्यांकडे तब्बल 777 कोटी 95 लाख रुपयांची थकबाकी होती. या एकूण थकबाकी मध्ये महावितरणकडून निर्लेखन, थकबाकी वरील व्याज व दंड माफी आणि वीज बिले दुरुस्ती अशाप्रकारच्या समा योजनेतून शेतकऱ्यांकडे आता सुधारित 639 कोटी 64 लाख रुपयांची थकबाकी आहे. या एकूण थकबाकी मधील 50 टक्के रक्कम जर भरले तर उर्वरित 50 टक्के म्हणजेच 309 कोटी 82 लाख रुपये माफ होणार आहेत व शेतकऱ्यांचे वीजबिल देखील संपूर्णपणे कोरे होणार आहे. आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदवला असून283 कोटी 98 लाख रुपयांचा थकबाकीचा भरणा केला आहे.
त्यामुळे या शेतकऱ्यांना थकबाकी वरील सूट व थकबाकी वरील व्याज मिळून एकूण 202 कोटी 52 लाख रुपये माफ झाले आहेत. या माध्यमातून तब्बल 70234 शेतकरी थकबाकी मुक्त झाले.
Published on: 23 March 2022, 09:56 IST