सध्या थंडीचे दिवस चालू झाले आहेत.थंडीच्या दिवसांमध्ये बर्याच लोकांचा कल हा अंड्याच्या सेवनाकडे जास्त असतो. कारण शरीरातील ऊर्जा टिकवण्याच्या कामात अंड्याचा उपयोग होतो.सर्व सामान्य जनांच्या खाण्यातील पौष्टिक खाद्य म्हणजे अंडी
परंतु आहे एनमोसमात अंड्यांचे दर महागल्यानेग्राहकांची पंचाईत झाली आहे. अंडी ही उष्ण आणि प्रत्येक प्रमाणात प्रोटिन्स देणारे असल्यामुळे साधारणपणे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आणि त्यांची मागणीत वाढ होते.त्यामुळे थंडीच्या दिवसात अंडी खाण्याचे प्रमाण वाढते पण थंडीमुळे अंडी महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. मागणी वाढल्यामुळे शहरातील घाऊक विक्रेत्यांकडे अंड्याच्या दर वाढले आहेत.
तीस अंड्यांच्या एका ट्रे चे दर 160 रुपये, तर गावठी अंड्याचा ट्रे तीनशे रुपयांपर्यंत वाढला आहे.
नाशिक जिल्ह्यातील अंडी विक्रेत्यांचा त्यांचा विचार केला तर त्यांच्याकडे विक्रीसाठी येणारी अंडी प्रामुख्याने हैदराबाद, आंध्र प्रदेश आणि नाशिक जिल्ह्यातून येत असतात.
त्यामुळे घाऊक विक्रेत्यांकडे अंड्याचे दरही 130 रुपयांपर्यंत होते मात्र हे दर सध्याच 160 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ विक्रेत्यांकडे अंड्यांचा ट्रे 180 रुपये दराने मिळत आहे. त्यामुळे एक अंडे सहा रुपयाला मिळत असून गावठी अंड्याचा ट्रे तीनशे रुपयाला असून एक अंडे दहा रुपयाला विकली जात आहे.(संदर्भ- सकाळ)
Published on: 11 December 2021, 07:09 IST