1. बातम्या

शेतकऱ्यांचा शेतमाल निर्यातीसाठी राज्य स्तरावर प्रयत्न चालू

किरण भेकणे
किरण भेकणे
export of agricultural commodities

export of agricultural commodities

कोरोना संसर्ग तसेच नैसर्गिक आपत्ती जे की अतिवृष्टी मुळे तसेच दुष्काळ परिस्थिती अशी अनेक संकटे शेतकऱ्यांनावर असून सुद्धा शेतकरी(farmer) राजाने आजिबात हार न मानता  आपल्या  शेतामध्ये  दिवसरात्र   कष्ट   करून  भाजीपाला, अन्नधान्य  पिकवतात आणि  देशातील  सर्व बांधवांना   उपलब्ध  करून देतात.यामुळेच शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादनासाठी जागतिक बाजारपेठ विक्री तसेच हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देऊन शेतमाल मोठ्या प्रमाणात निर्यात वाढावी यासाठी राज्य स्तरावर कृषी विभाग मार्फत कृती दल गठीत करणार असल्याचे आपल्या राज्याचे कल्याणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे.

आयुर्वेदामध्ये रानभाज्याना खूप महत्वाचे स्थान:

१२ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी नाशिक पंचायत समितीमध्ये राणभाजी महोत्सव आयोजित केला होता त्याचे उद्घाटन राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्या मार्फत झाले.त्यावेळी ते आपल्या भाषणात म्हणाले की  रानभाज्या चे संवर्धन  तसेच  त्यांची  ओळख  यामध्ये  आदिवासी बांधव  लोकांचे खूप मोठे योगदान आहे जे की या कोरोनाच्या परिस्थितीत आपल्या शरीराची जर प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर रानभाज्या आपण आहारात ठेवल्या पाहिजेत.

हेही वाचा:जळगाव जिल्ह्यात पावसाच्या अभावामुळे कडधान्य उत्पादनात घट

आयुर्वेदामध्ये रानभाज्याना खूप महत्वाचे स्थान आहे जे की आपल्या शरीराला हे पोषक तसेच या मधून जीवनसत्त्वे आणि प्रतिकारशक्ती वाढते आणि याबद्धल शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना याचे महत्व समजावे म्हणून आपण हा महोत्सव आयोजित केला आहे. त्यामुळे राणभाजी महोत्सव फक्त एक दिवस न ठेवता महिन्यातून २ वेळा तरी आयोजला पाहिजे असे दादा भुसे यांनी सांगितले.या महोत्सवात  जिल्ह्यामध्ये  असणाऱ्या सर्व रानभाज्या  व  रानफळे  याची वैशिष्ट्य, आरोग्यासाठी लाभदायक गुणधर्म, संवर्धन पद्धती, भाजीची रेसिपी या सर्वच गोष्टीची माहिती दिली.

कृषी विभागाने आदिवासी नागरिकांशी संवाद साधावा तसेच महिती मिळवून रानभाज्यांची माहिती अशी पुस्तके तयार करून सगळीकडे याची जागृती करावी तसेच यासाठी वेगवेगळ्या शहरात प्रदर्शन भरवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी असे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.या कार्यक्रमात आदिवासी शेतकऱ्यांचा उपस्थित असलेले मान्यवर यांचा हस्ते सत्कार केला, तसेच कृषी विभागातील युरिया ब्रिकेट अंतर्गत चांगले काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाचा सुद्धा सन्मान करण्यात आला.रानभाज्या महोत्सव मध्ये ७७ भाज्यांचे प्रदर्शन ठेवले होते त्यामध्ये २५ भाज्या विकण्यासाठी ठेवल्या होत्या.

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters