1. बातम्या

राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल ३१ जुलै तर बारावीचा २० जुलैपर्यंत लागणार

राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे, यामुळे दहावी आणि बारावीचे निकाल खोळंबले आहेत. हे निकाल लवकरत जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. दहावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत तर बारावीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान लागणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

हिंगोली दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना निकालाबदद्लची माहिती दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका शैक्षणिक क्षेत्रालादेखील बसला आहे. दहावी, बारावीचे विद्यार्थी  निकालाची वाट पाहत आहेत. निकालाला विलंब झाल्यानं आता पुढील प्रवेशालादेखील उशीर होणार आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळाचा निकाल एकत्रित जाहीर केला जातो. यापैकी मुंबई, ठाणे, पुण्यात, कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पेपर तपासणीच्या कामाला उशीर झाला आहे.

कोरोनाचा फैलाव सुरू झाला तेव्हा बारावीची परीक्षा पूर्ण झाली होती. दहावीचा भूगोल पेपर कोरोनामुळे रद्द झाला. या पेपरचे गुण सरासरी पद्धतीने दिले जाणार आहेत. शासनानं शाळा महाविद्यालयानं अद्याप परवानगी दिलेली नाही. बारावीचे निकाल ऑनलाईन  जाहीर झाल्यानंतर आठ दिवसांनी गुणपत्रिका दिल्या जातात. त्यासाठी  विद्यार्थ्यांना  महाविद्यालयात यावे लागते. मात्र सध्याच्या परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters