News

गेल्या काही दिवसापासून खाद्य तेलाच्या किमतीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. परंतु आता सरकारने देशात वाढत्या किमती लक्षात घेऊन एक विशेष प्रकारची योजना आखली आहे. त्यामुळे खाद्य तेल स्वस्त होईल अशा प्रकारच्या आशा निर्माण झाली आहे.

Updated on 14 May, 2021 5:26 PM IST

गेल्या काही दिवसापासून खाद्य तेलाच्या किमतीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. परंतु आता सरकारने देशात वाढत्या किमती लक्षात घेऊन एक विशेष प्रकारची योजना आखली आहे. त्यामुळे खाद्य तेल स्वस्त होईल अशा प्रकारच्या आशा निर्माण झाली आहे.

देशातील बंदरामध्ये मंजुरीच्या प्रतीक्षेत अडकलेल्या आयातदार स्टॉप जाहीर झाल्यानंतर खाद्यतेलाच्या किरकोळ किमती कमी होतील अशी अपेक्षा केंद्राने सोमवारी व्यक्त केली. जर या मध्ये सरकारी आकडेवारीचा विचार केला तर एका वर्षात खाद्यतेलाच्या किरकोळ किमती 55.55 टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामुळे covid-19 साथीने तयार झालेल्या संकटाचा सामना करणाऱ्या ग्राहकांच्या अडचणींमध्ये आणखीनच वाढ झाली आहे. खाद्य तेलाच्या किमती वाढविण्याच्या उचललेल्या या प्रश्नाच्या उत्तरात अन्न सचिव सुधांशू पांडे म्हणाले की,  सरकार खाद्य तेलाच्या दरावर बारीक लक्ष ठेवून आहे.

 

यासंदर्भात माहिती देताना सचिवांनी सांगितले की,  कोविड  परिस्थिती लक्षात घेता तेल कंपन्यांनी अलीकडेच नमूद केले आहे की, कांडला आणि मुंद्रा बंदरावर काही स्टॉक अडचणीत अडकले आहेत. सध्याची को बीडची परिस्थिती पाहता सर्वसाधारण जोखमीच्या विश्लेषणाच्या रूपात विविध एजन्सीद्वारे घेतल्या गेलेल्या चाचण्यांची संबंधित मंजुरीला उशीर झाला आहे.ही समस्या सीमाशुल्क आणि अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण कडे सोडवली गेली आहे आणि हा स्टॉक बाजारात सोडताच आपल्याला खाद्य तेलाच्या किमतीवर त्याचा परिणाम होण्याची अपेक्षा आहे असे त्यांनी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले.  पुढे माहिती देताना त्यांनी सांगितले की,  खाद्य तेलाची  कमतरता भागवण्यासाठी आपला देश आयातीवर अवलंबून आहे.  दरवर्षी 75 हजार कोटी रुपयांचे खाद्यतेल आयात केले जाते.

 

पाम तेलाची किंमत

 पाम तेलाचे किरकोळ किंमत 51. 54 टक्‍क्‍यांनी वाढून 132.6रुपये प्रति किलो वर गेले आहे त्या आधी 87.5 रुपये प्रति किलो, सोया तेल 50 टक्क्यांनी वाढून 158 रुपये प्रति किलो दर राहिला आहे,  जो आधी 105 रुपये प्रति किलो होता.  मोहरीच्या तेलाचे दर एकूण 50 टक्क्यांनी वाढून ते 163.5 रुपये प्रतिकिलो झाले.  जे अगोदर 110 रुपये प्रति किलो होते. सोयाबीन तेलाची किरकोळ किंमत ही या काळात 37 टक्‍क्‍यांनी वाढून 132.6 रुपये प्रतिकिलो वर गेली आहे. जी पूर्वी 87.5 रुपये होती.  शेंगदाणा तेलाच्या दरात 38 टक्‍क्‍यांनी वाढून 180 रुपये प्रति किलो झाला आहे. जो याआधी 130 रुपये प्रति किलो होता.

 माहिती स्त्रोत-HELLO महाराष्ट्र

English Summary: Edible oil will be cheaper, good news for consumers 14
Published on: 14 May 2021, 05:26 IST