रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे, अनेक देशाचे आर्थिक नियोजन बिघडले असून, पुरवठा साखळीवर झाला आहे, जगातील महागाई वाढत असतानाच इंडोनेशिया देशाने खाद्य तेलाच्या निर्यातीवर अचानक बंदी घातली आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी येत्या २८ तारखेपासून पाम तेलासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची निर्यात थांबवण्याची घोषणा केली आहे. पाम तेलाच्या उत्पादनात इंडोनेशिया जगातील सर्वात जास्त निर्यात करणारा देश आहे. मात्र, स्थानिक पातळीवर सध्या तिथे या तेलाचा तुटवडा आहे.
भारततही खाद्य तेल बनवणाऱ्या कंपन्या आहेत, परंतु भारत पाम तेलाची ६० टक्के आयात इंडोनेशियातून करतो. जागतिक वनस्पती तेलाच्या निर्यातीपैकी एक ततीयांश वाटा इंडोनेशियाचा आहे. त्यामुळे इंडोनेशियाने निर्यात बंदीच्या निर्णयाचा फटका खाद्यतेल आयात करणाऱ्या देशांना बसणार आहे. मोठ्या प्रमाणावर खाद्य तेल आयात करणाऱ्या देशांमध्ये चीन आणि भारत आघाडीवर आहे. भारतात तेलाच्या किमती आधीच वाढल्या आहेत आणि इंडोनेशियाच्या निर्यातबंदीमुळे भारतातील खाद्यतेलाच्या किमती आणखी वाढू शकतात. भारतात खाद्यतेल २०० रुपये प्रति लिटर आहे.
युक्रेन हा सूर्यफूल तेलाचा प्रमुख उत्पादक आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. दक्षिण अमेरिकन देशांमध्ये दुष्काळामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. पामतेलाच्या टंचाईमुळे ग्राहकांना सोयाबीन, सूर्यफूल, मोहरी असे महागडे तेल घ्यावे लागत आहे.
इंडोनेशियाच्या निर्यातबंदीमुळे भारतातील खाद्यतेलाच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो. भारतात खाद्यतेलाच्या किमती वाढू शकतात. लोकांना महागाईचा फटका बसत आहे. इंडोनेशियाच्या या निर्णयाने त्या देशातील तेलाच्या किमती कमी होतील. मात्र भारतात तेलाच्या किमतीत मोठी वाढ होईल.
महत्वाच्या बातम्या
कृषी विभागाचा महत्वपूर्ण सल्ला आला रे…..!! खरीप हंगामात सोयाबीन बियाणे खरेदी करताना बाळगा ही सावधानता
कृषी पदवीधरांची ५० वर्षांनी जमली गट्टी; अनेक विद्यार्थी यशस्वी उद्योजक
Published on: 26 April 2022, 04:12 IST