सोयाबीन व पामतेल या खाद्यतेलाच्या किमतीमध्ये १० रुपये ने वाढ झाल्यामुळे महागाईचा मोठया प्रमाणात भडका उडत असलेला दिसत आहे. जे की घरातील गृहिणी खाद्य तेलाच्या किमती वाढल्यामुळे भाजीला फोडणी सुद्धा देत नाहीत एवढेच काय तर देवाच्या पुढे दिवा लावण्यासाठी जो तेलाचा वापर होत असल्याने त्या हात आकडत आहेत.
लोकांची मात्र चिंता वाढलेली दिसून येत आहे:
सध्या स्तिथी पाहायला गेलं तर पामतेलाची किमंत १३० रुपये प्रति लिटर तर सोयाबीन तेलाची(oil) किमंत प्रति लिटर १५० रुपये आहे. इतिहासात पहिल्यांदाच सोयाबीन तेलाचे भाव शेंगदाणा तेलाच्या भावा एवढे झालेले दिसून येत आहेत.श्रावण चालू होयच्या तोंडावर या खाद्यतेलाच्या किमती मध्ये वाढ झाली असून मध्यम वर्गीय लोकांची मात्र चिंता वाढलेली दिसून येत आहे तसेच पुढे सण सुरू झाल्यावर यामध्ये अजून किती वाढ होईल हे सुद्धा सांगणे कठीण झालेले आहे.
हेही वाचा :शेतीचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी संशोधकांनी कसली कंबर
या खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये वाढ झालेली असून सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट बिघडलेले आहे. दुकानाच्या बाहेर जे फलक असते जे की त्यावर किमती मध्ये वाढ झालेली लिहून ठेवले असते त्या किंमती मध्ये वाढ बघून सर्व सामान्य लोकांचे डोळे मात्र पांढरे झालेले दिसत आहेत.मागील काही दिवसात लातूर येथे सोयाबीनला ९ हजार रुपये प्रति क्विंटल तर मध्य प्रदेश मधील मंडसौर येथील पिपलियामंडित सोयाबीनला १२ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळलेला आहे आणि याचाच परिणाम सोयाबीन खाद्य तेलाच्या भावावर झालेला दिसून येत आहे.
पामतेलाच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झाल्यामुळे मागील सहा महिन्यात ३० टक्के नागरिकांनी खाद्यतेल खरेदी करणे सोडूनच दिलेले आहे आणि याच फटका विक्रेत्या वर्गाला बसत आहे.सरकार कोणतेही असो मात्र जेव्हा सण येतात त्यावेळी खाद्य तेलाच्या किमतीमध्ये वाढ झालेली दिसून येतेच आणि अत्ता सुद्धा तेच चालू आहे.मागील वर्षांपासून खाद्य तेलाचा भाव वाढतच चाललेला आहे जो की सण असल्यामुळे नाही तर वाढतच चाललेला दिसून येत आहे.
Published on: 06 August 2021, 02:17 IST