News

सध्या रशिया आणि युक्रेन मध्ये घमासान युद्ध सुरू असून या युद्धाचा आज दहावा दिवस आहे. या युद्धाचे परिणाम सगळ्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर होताना दिसत आहे.

Updated on 05 March, 2022 11:08 AM IST

सध्या रशिया आणि युक्रेन मध्ये घमासान युद्ध सुरू असून या युद्धाचा आज दहावा दिवस आहे. या युद्धाचे परिणाम सगळ्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर होताना दिसत आहे.

अगोदरच सर्वसामान्य नागरिक महागाईला त्रस्त असताना  पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीनंतर आता खाद्यतेलाच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे डोकेदुखी वाढवली आहे. दर गेल्या पंधरा दिवसाचा विचार केला तर खाद्यतेलाच्या दरात 20 रुपयांनी वाढ झाली  आहे. सोयाबीन, सूर्यफूल आणि भुईमूग सारख्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ तर होतच आहे परंतु 200 रुपये प्रति लिटर वर मोहरीच्या तेलाचा दर पोहोचला आहे.

 भारताची खाद्य तेलाच्या बाबतीत परिस्थिती

 जर आपल्या भारताचा विचार केला तर 65 टक्के खाद्य तेल आयात करावे लागते वयामध्ये 60 टक्के वाटा हा पाम तेलाचा  आहे या पाम तेलाची  मलेशिया आणि इंडोनेशिया या देशातून करतो

अगोदरच करोना मुळे पुरवठासाखळी विस्कळीत असतानाच रशिया युक्रेन युद्धामुळे तेल टंचाई निर्माण होण्याची शक्यता वाढली असून कच्च्या तेलाचा पुरवठा मर्यादित आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सूर्यफूल तेलाचा विचार केला तर 19 लाख टन आयात करण्यात आली त्यापैकी सोळा लाख टन सूर्यफूल तेलाचे आयात रशिया आणि युक्रेन मधून  करण्यात आली.आता हे युद्ध सुरू झाल्याने या आयातीमध्ये खंड पडू शकतो.

 भारतातील तेलबिया उत्पादनाची परिस्थिती

खाद्य तेलाचे दर कमी व्हायच्या असतील तर भारत तेलबिया उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे महत्त्वाचे आहे.सरकारकडून तेलबियालागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.कृषी विभागाच्या अंदाजानुसार या वर्षी 371 लाख तेलबियांचे  उत्पादन होण्याची शक्यता आहे मात्र तरीही आयातीवर ची  निर्भरता फार मोठ्या प्रमाणावर कमी होईल असे दिसत नसल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडन्याचेकाम खाद्य तेलाचे दर करतील हे नक्की.

English Summary: edible oil prices hike due to supply chain disturbe due to rusia ukrein war
Published on: 05 March 2022, 11:08 IST