News

भारतात महागाई एक नवीन विक्रम प्रस्थापीत करत आहे. पेट्रोल डिझेल समवेत अनेकोनेक गोष्टींच्या आसमानी किंमतीमुळे कॉमनमॅन पार हतबल झाला आहे. ह्या भस्मासुरसारख्या महागाईमुळे 'कॉमनमॅन'चा खर्च हा 'विविआयपी' सारखा झाला आहे आणि त्यामुळे त्याचा उदरनिर्वाह भागत नाही आहे. पण आता महाराष्ट्राच्या जनतेसाठी थोडीशी सुखेची चाहूल आली आहे. सणासुदीला महाराष्ट्रातील मराठवाड्यात खाद्यतेलाच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे

Updated on 22 October, 2021 1:55 PM IST

त्यामुळे नक्कीच लोकांना ह्याचा फायदा होणार आहे. दिवाळीच्या पार्शवभूमीवर खाद्यतेलाच्या किमतीत झालेली ही घट नक्कीच लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणेल ह्यात तिळमात्रही शंका नाही. दिवाळीच्या सणाला आपल्याकडे चिवडा, चकली, करंजी, शंकरपाळे, अनारसे इत्यादी अनेक प्रकारची स्वादिष्ट व्यंजने बनवली जातात ह्या बातमीमुळे ह्या व्यंजनचा आस्वाद आता पब्लिक मोकळेपणाने घेईल अशी आशा कृषी जागरणला देखील आहे. केंद्र सरकारने नुकतेच आपल्या आयात धोरणात बदल केला आणि खाद्यतेलाच्या आयात शुल्कमध्ये घट केली ह्याचा परिणाम म्हणुन औरंगाबादमध्ये सोयाबीन आणि सूर्यफूलच्या तेलाच्या किमतीत 5 रुपयापासून ते 10 रुपयापर्यंत घट घडून आली आहे. येणाऱ्या आगामी ऐन सणासुदीच्या दिवसात अजूनही खाद्यतेलाच्या किमतीत घट होईल असे मत व्यापारी मांडताना दिसत आहेत.

पुढच्या वर्षी पर्यंत लागू राहील ही आयातशुल्कतील घट

विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दोन दिवस आधी, केंद्र सरकारने 31 मार्च 2022 पर्यंत पाम, सोयाबीन आणि सूर्यफूलच्या कच्च्या तेलावर सीमाशुल्क आणि कृषी उपकर कमी करण्याची घोषणा केली आहे. कच्च्या पाम तेलावर 7.5 टक्के आणि सूर्यफूलच्या कच्च्या तेलावर 5 टक्के कृषी उपकर लावला जाईल.  पाम तेलासाठी सीमाशुल्क 8.25 टक्के, सोयाबीन तेलासाठी 5.5 टक्के आणि सूर्यफूल तेलासाठी 5.5 टक्के करण्यात आले आहे.  त्याचा परिणाम आता मराठवाड्यातील औरंगाबाद शहरातील बाजारपेठांमध्येही दिसून येत आहे.

औरंगाबाद मध्ये सोयाबीन तेल 10 रुपयांनी स्वस्त झाले असून ते आता 135 रुपय लिटर ह्या किमतीने विकले जात आहे. तसेच पाम तेलवर 5 रुपयाची घट झाली आहे आता पाम तेल 150 रुपयांना विकले जात आहे.  तसेच सूर्यफूल तेलाची किंमत ही सध्या 150 रुपये प्रति लिटर आहे. येत्या सणासुदीच्या नजीकच्या काळात किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

 माहितीस्रोत टीव्ही9भारतवर्ष

English Summary: edible oil prices decrease in maharashtra some reason behind thats situation
Published on: 22 October 2021, 01:55 IST