News

प्रत्येक गावाची एक आपली ओळख असते. तसेच अनेक गावांना काही ना काही परंपरा देखील असते. तसेच अनेक गावे इतिहासातील अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतात. असे असताना आता एक असे गाव आहे ते गाजराचे गाव म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. येथील शेतकरी संक्रातीच्या सणाला काढायला येथील अशा पद्धतीने गाजराची लागवड करतात, आणि यामधून मोठ्या प्रमाणावर पैसे देखील कमवतात. यामुळे या गावाची राज्यात सध्या चर्चा सुरु आहे.

Updated on 14 January, 2022 1:06 PM IST

प्रत्येक गावाची एक आपली ओळख असते. तसेच अनेक गावांना काही ना काही परंपरा देखील असते. तसेच अनेक गावे इतिहासातील अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतात. असे असताना आता एक असे गाव आहे ते गाजराचे गाव म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. येथील शेतकरी संक्रातीच्या सणाला काढायला येथील अशा पद्धतीने गाजराची लागवड करतात, आणि यामधून मोठ्या प्रमाणावर पैसे देखील कमवतात. यामुळे या गावाची राज्यात सध्या चर्चा सुरु आहे. या गावाचे नाव म्हणजे कवलापूर. सांगली जिल्ह्यातील या गावातील शेतकऱ्यांनी वाडवडिलांपासून गाजर पिकवण्याची परंपरा कायम ठेवली आहे. आणि ती आजही टिकून आहे.

येथील शेतकऱ्यांनी कमी कालावधीत ताजे उत्पादन व उत्पन्न देणारे पीक म्हणून त्यास पसंती दिली आहे. यामुळे गावाचे अर्थकारण यावरच अवलंबून असल्याचे सांगितले जाते. यामधून शेतकरी लाखी रुपये एकहाती कमवतात. मकर संक्रांतीच्या काळात गाजराला मोठी असते. यामुळे हमखास यामधून पैसे मिळतात. कवलापूर गावाला गाजर पिकाची परंपरा शतकाहून अधिक वर्षांची असल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे गावाचा उल्लेख झाला तर ते गाजराचे गाव का असे म्हटले जाते. तसेच लागवड करताना प्रामुख्याने पारंपरिक वाणाचाच वापर केला जातो.

गावात सुमारे ४० टक्क्यांहून अधिक शेतकरी या पिकात गुंतले आहेत. तसेच या गावातील जमीन देखील गाजराच्या पिकास चांगली असल्याने गाजराचा चांगलीच गोडी येते. यामुळे अनेक व्यापारी या गाजरांची खरेदी करण्यासाठी आतुर असतात. हा परिसर द्राक्ष बागांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र हे पीक घेत असताना मोठा खर्च असतो तसेच पैसे मिळण्यासाठी वर्षभर वाट बघावी लागते. तसेच अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर हवामान बदलत आहे. तसेच अवकाळी पावसामुळे मोठी रिस्क आहे. यामुळे येथे आजही गाजराची शेती टिकून आहे.

तसेच येथील काही शेतकरी बियाणे देखील तयार करून ते विकतात. यामुळे त्यामधून देखील चांगले पैसे त्यांना मिळतात. याकाळात अनेक मजुरांना देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार देखील उपलब्द होतो. अनेकांनी परराज्यातून देखील मजूर याठिकाणी आणले आहेत. अनेक कुटूंब येथील शेतकऱ्यांकडे कामाला आहेत. यामुळे यावर अनेकांचे पोट अवलंबून आहे. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान गाजराच्या काढणीला सुरुवात होते. याकाळात शेतकरी याच कामात व्यस्त असतात.

तसेच याठिकाणी शेतकऱ्यांना त्यांचा माल कुठे घेऊन जावे लागत नाही. व्यापारी स्वतः याठिकाणी येऊन बांधावरच गाजराची खरेदी करत असतात. तसेच जागेवरच शेतकऱ्यांना पैसे मिळतात. एकहाती पैसे मिळत असल्याने अनेक शेतकरी याकडे वळाले आहेत. यासाठी त्यांना कुठं जावे लागत नाही. सांगलीमधून राज्यासह कर्नाटक, बेळगावमध्ये हा माल पाठवला जातो. संक्रातीप्रमाणेच इतर दिवशी देखील याला चांगले मार्केट असते. यामुळे या गावाला गाजराचे गाव म्हणून ओळखले जाते.

English Summary: economy village is on carrots, farmers earn lakhs of rupees from carrots for Sankrati.
Published on: 14 January 2022, 01:06 IST