शेतकऱ्यांना उंदरांमुळे होणारे नुकसान मोठे आहे. अधिक प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये उंदीर गव्हासारखे संपूर्ण पीक नष्ट करू शकतात. उसाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. आता रसायनांचा वापर न करताना उंदरांपासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी ऑस्ट्रेलिया येथील सिडनी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी नवी पद्धत शोधली आहे.
गहू कोंबाच्या वासावर आधारित या तंत्रामुळे किमान ६३ टक्के ते ७४ टक्के इतक्या गहू पिकाचा बचाव शक्य होत असल्याचे चाचण्यातून आढळले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये २०२१ मध्ये उंदरांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे पिकांचे एक अब्जापेक्षा डॉलरचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
अशा स्थितीमध्ये तयार झालेले पीक डोळ्यांसमोर उंदरांनी खाऊन फस्त केल्याची स्थिती होती. ही समस्या भविष्यात सातत्याने येत राहणार असल्याचे लक्षात घेऊन सिडनी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी त्यांच्या नियंत्रणासाठी संशोधनाला सुरुवात केली. यामुळे त्यांना यामध्ये मोठे यश मिळाले आहे.
जगातील सर्वात लहान गाय 'पुंगनूर' हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर..
विद्यापीठातील सिडनी इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर ॲण्ड स्कूल ऑफ लाइफ ॲण्ड इन्व्हायर्मेंटल सायन्सेस येथील प्रो. पीटर बँक्स, डॉ. कॅथरिन प्राइस आणि जेन्ना बायथेवे यांच्यासह पीएच.डी. विद्यार्थी फिन पार्कर या विषयावर काम करत होते. त्यांनी गहू पिकावर गहू कोंबाच्या तेलाच्या (व्हीट जर्म ऑइल) विरल द्रावणाची फवारणी करण्याचे तंत्र विकसित केले आहे.
या रसायनविरहित तंत्रामुळे सामान्य परिस्थितीच्या तुलनेमध्ये उंदराकडून गहू दाणे पळविण्याची शक्यता ६३ टक्क्यांनी कमी होते, हे संशोधन नेचर सस्टेनेबिलिटीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
जगातील सर्वात लहान गाय 'पुंगनूर' हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर..
गहू कोंबाचे तेल हे गहू प्रक्रियेतील उपउत्पादन असून, ते अत्यंत स्वस्त आहे. त्याचे पाण्यासोबत विरल केलेले द्रावण अन्य कोणत्याही उंदीरनाशकांप्रमाणे किंवा आमिषाप्रमाणे विषारी नाही. त्यामुळे अन्य कोणावरही त्याचे विपरीत परिणाम होत नाहीत. तसेच ते पर्यावरणपूरकही आहे. उंदरांच्या नियंत्रणासाठी वेगवेगळे उपाय करूनही त्यांची संख्या आणि त्रास कमी होत नसल्यास हे नवे तंत्र उपयोगी ठरू शकते.
अखेर राज्यात पावसाला सुरुवात, 'या’ ठिकाणी आज पडणार मुसळधार पाऊस, यलो अलर्ट जारी…
सोयाबीन लागवड
खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन
Published on: 12 June 2023, 11:48 IST