सध्या विधानसभेसह विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. यावेळी विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करत आहेत. यामुळे हे अधिवेशन इतर अधिवेशनापेक्षा काहीसे वेगळे आहे. सध्याच्या राजकीय पेचामुळे एकाच पक्षातील दोन नेते एकमेकांसमोर उभे असल्याचे चित्र दिसून आले. असे असताना विरोधकांनी पायऱ्यांवरच घोषणाबाजी केली आहे.
यामध्ये विरोधकांकडून 'खाऊन 50 खोके माजलेत बोके, ईडी ज्याच्या दारी तो भाजपच्या दारी', तसेच ५० खोके एकदम ओके. आले रे आले गद्दार आले, अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्याचे पाहायला मिळाले. यामुळे याची चर्चा सुरु आहे. शिंदेगटाच्या बंडाचं केंद्र असलेल्या गुवाहाटीचा संदर्भ देत महाविकास आघाडीच्या (MahaVikas Aghadi) नेत्यांनी घोषणा दिल्या. “गद्दारांना भाजपची ताट वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी!”, या घोषणेने सर्वाचंच लक्ष वेधलं.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं. यामुळे सरकार पडले. यावेळी शिवसेना राष्ट्रवादीसह काँग्रेसचे आमदार एकसाथ थांबून घोषणा देत असल्याचे दिसून आले. शिंदे फडणवीस सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असल्यामुळे या अधिवेशनात नवीन सरकार काय महत्वाचे निर्णय घेणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष आहे.
यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यसह इतर आमदार त्यासोबतच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह इतर आमदार घोषणा देताना दिसून आले. शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची आक्रमक मागणी करण्यात आली आहे. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! महाराष्ट्रातल्या भाजपच्या माजी खासदाराचा आपमध्ये प्रवेश, केजरीवाल यांचे मिशन महाराष्ट्र सुरू
शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या जिल्हा बँका राज्य बँकेत विलीन होणार? मोदी सरकारचा निर्णय
टोळ्यांनी फसवलं!! ऊसतोड कामगारांकडून तब्बल 39 कोटी रुपयांची फसवणूक, धक्कादायक आकडेवारी आली समोर
Published on: 22 August 2022, 01:03 IST