शेण, माती अन् राखेतून कमवा पैसा ; गावगाड्याला पैसा कमावण्याची संधी

11 February 2021 11:14 PM By: भरत भास्कर जाधव
शेणापासून कमवा पैसे

शेणापासून कमवा पैसे

लॉकडाउननंतर ऑनलाइन शॉपिंगकडे लोकांचा कल वेगानं वाढला आहे. आपल्याला फक्त एका क्लिकवरुन ऑर्डर केलेली वस्तू किंवा सामानाची घरी डिलिव्हरी मिळते. ऑनलाइन शॉपिंग करताना अनेक प्रकारचे पर्याय आणि ऑफर देखील आपल्याला मिळतात. मात्र, आता काही वेबसाइटवर अशा काही वस्तू मिळत आहेत ज्या वस्तू कधी विकल्या जातील याचा विचार आपण स्वप्नात देखील केला नसेल.

ग्रामीण भागात आपण कोणाला सांगितले की, राखी विकली जाते हे ऐकल्यानंतर तेथील लोक आपल्याला वेढ्यात काढतील मात्र, हे खरे आहे ऑनलाइनमध्ये राख देखील विकली जाते आहे.  या राखेची किंमत देखील खूप जास्त आहे 500 रुपये प्रति किलोपर्यंत ही राख मिळते. ग्रामीण भागात ही राख कचर्‍यामध्ये फेकली जाते. काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील लोक या राखेने दात घासत होते. तर पूर्वीच्या लोक भांडी घासण्यासाठी राख वापरत होते. मात्र,ऑनलाइन पध्दतीने राख विकली जाते ही ग्रामीन भागातील लोकांसाठी आर्श्चयाची बाब आहे.

 

गायीच्या आणि म्हशीच्या शेणापासून गवऱ्या तयार केल्या जातात. प्रामुख्याने चुलीला घालण्यासाठी या गवऱ्या तयार केल्या जातात या गवऱ्याची ग्रामीण भागात काहीच किंमत नाही प्रत्येकाच्या घरी तुम्हाला दिसतील. परंतु आता या गवऱ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकल्या जात आहेत. नुसत्या विकल्याच जात नाहीतर त्याची किंमतही दाबून घेतली जाते हे विशेष आहे. 150 रुपयांपर्यंत या विकल्या जातात देतात.

गाईंचे गोमूत्र मोठ्या प्रमाणात असते मात्र, तेथील गोमूत्र वाया जाते त्या गोमूत्राचा कोणीही उपयोग घेत नाही. मात्र,ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर गाईचे गोमूत्रदेखील विकले जात आहे. 500 मि.ली. गौमूत्राची किंमत 260 आहे. आता मुलतानी मिट्टीपासून ते शेतातली काळी माती ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकली जात आहे. खास गोष्ट म्हणजे लोकही ते अत्यंत उत्सुकतेने विकत घेत आहेत. 500 ग्रॅम मातीची किंमत सुमारे 100 रुपये आहे आणि लोक ते विकत घेत आहेत.

 

cow dung mitti multani matti
English Summary: earn money from dung and mitti ; villagers can earn money easily

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.