News

आज लोक शेतीमध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग करून लाखो रुपयांचा फायदा मिळवत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहे आणि उत्पन्न वाढवत आहेत.आपण थोड्या शेती मध्ये सुद्धा औषधी वनस्पतींची लागवड करून लाखो रुपये कमवू शकतो. या साठी कमी गुंतवणूक करून सुद्धा आपण चांगले उत्पन्न मिळवू शकतो.

Updated on 01 October, 2021 7:06 PM IST

आज लोक शेतीमध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग करून लाखो रुपयांचा फायदा मिळवत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहे आणि उत्पन्न  वाढवत आहेत. आपण  थोड्या शेती मध्ये सुद्धा औषधी वनस्पतींची लागवड करून लाखो रुपये कमवू शकतो. या साठी कमी गुंतवणूक करून सुद्धा आपण चांगले उत्पन्न मिळवू शकतो.

हर्बल वनस्पतींची बाजारपेठ ही कोटयावधी रुपयांची आहे:

बाजारात औषधी वनस्पती ला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. प्रत्येक घराघरांत औषधी वनस्पती वापरल्या जातात. या मध्ये तुळशी, कोरफड, अतिश,कुंठ,कपिकाचू, शंखपुष्पी, लेव्हनडर या सारख्या वनस्पती लावून आपण त्यापासून उत्पन्न मिळवू शकतो.या प्रकारच्या हर्बल वनस्पती ची  लागवड  आपण  आपल्या गॅलरी मध्ये करू शकतो  किंवा  घरावरील कुंड्यात  सुद्धा  करू शकतो. या साठी खूप खर्च सुद्धा होत नाही अवघ्या हजारात हे सर्व होऊ शकते.हर्बल वनस्पतींची बाजारपेठ ही कोटयावधी रुपयांची आहे. इकॉनॉमिक्स टाइम्स च्या एका अहवाल पत्रानुसार हर्बल वनस्पतींची बाजारपेठ ही सुमारे 50 हजार कोटी रुपयांची आहे. हीच हर्बल वनस्पतींची बाजारपेठ ही दर वर्षी 15 ते 20 टक्क्यांनी वाढत आहे.

हेही वाचा:वारंवार वेगवेगळ्या संकटाना सामोर जात शेतकऱ्याने कापली चक्क दीड हजार केळीची झाडे

आपल्या देशात एकूण 1058.1 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. त्यापैकी फक्त 6.64 लाख हेक्टर क्षेत्रात औषधी वनस्पती आणि सुगंधित वनस्पती  यांची  लागवड  केली  जाते.हर्बल वनस्पती ला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तुळशीला धार्मिक स्वरूप प्राप्त झाले आहे त्याचबरोबर तुळस ही एक आयुर्वेदिक  वनस्पती आहे. अनेक आजारांवर  तुळस  ही  गुणकारी  आहे. हर्बल वनस्पती मध्ये तुम्हाला जर 1 हेक्टर तुळस पिकवण्यासाठी 15 हजार रुपये खर्च होतो. परंतु 3 महिन्यांच्या कालावधी मध्ये या पिकाचे 3 लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकते.

त्याचबरोबर अतिश या औषधी वनस्पती ची लागवड करून आपण एकरी 2 ते 3 लाख रुपये एवढे उत्पन्न मिळवू शकतो. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील लोक या वनस्पती ची लागवड करून लाखो रुपये कमवत आहेत.लेव्हनडर  पासून तेल (oil)निर्मिती केली जाते. त्याचा उपयोग  वेगवेगळी  सुगंधी  उत्पादने तयार करण्यासाठी केला जातो. या वेगवेगळ्या प्रकारच्या हर्बल वनस्पतींची लागवड करण्यासाठी पतंजली, डाबर, वैद्यनाथ, या सारख्या मोठमोठ्या कंपन्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून शेतकऱ्यांना हर्बल वनस्पती लागवडी साठी प्रोत्साहन देत आहेत.

English Summary: Earn millions of rupees per month by doing herbal herbal farming
Published on: 01 October 2021, 07:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)