News

मान्सून लवकर दाखल होणार असल्याने अंदमान बेटावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच पावसाचे आगमन होणार हे निश्चित झाले आहे. मात्र या पावसाने कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. सध्या उन्हाळी कांदा नुकताच निघाला असून कमी दराअभावी शेतकरी अडचणीत आला आहे.

Updated on 16 May, 2022 5:35 PM IST

यंदाचा कडक उन्हाळा आणि दिवसेंदिवस तापमानाचा वाढता पारा लवकरच्या पावसाचा अंदाज व्यक्त करत होता. त्यातच मान्सून लवकर दाखल होणार असल्याने अंदमान बेटावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच पावसाचे आगमन होणार हे निश्चित झाले आहे. मात्र या पावसाने कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. सध्या उन्हाळी कांदा नुकताच निघाला असून कमी दराअभावी शेतकरी अडचणीत आला आहे.

जागेअभावी कांदा साठवणे शक्य नसल्याने अनेक शेकऱ्यांचे कांदे शेतात ढिग करून पडले आहेत. मागील वर्षी कांद्याला चांगले दर मिळाल्याने मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी कांदा केला. मात्र कांदा उप्तादन निघू लागताच कांदा दर झपाट्याने खाली आले. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन चांगले झाले असले तरी दर नसल्याने शेतकरी कांदा विक्री करत नाही. तर काही दिवसात दरवाढ होईल आणि कांदा विकता येईल या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांना लवकरच पावसाळा अडचणीचा ठरणार आहे.

त्यामुळे एकतर कमी भावात कांदा विकणे किंवा कांदा भिजून खराब होणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील उन्हाळ्यात ५० ते ६० रुपये १० किलो असलेला कांदा यंदा ११० ते १२० असल्याने शेतकऱ्यांना कांदा दरवाढीची मोठी अपेक्षा आहे. मात्र पावसाने आणखी काही दिवस उसंत घेतल्यास शेतकऱ्याला अपेक्षित कांदा दर मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कितीही तडजोड करून स्वतः काबाडकष्ट करून कांदा पिकवला तरी एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे १० किलोला कमीत कमी २०० रुपये दर मिळाल्यास शेतकऱ्याचा खर्च निघणार आहे. त्यामुळे सध्या वरुणराजाला शेतकरी याचना करत असून कांद्याला योग्य दर मिळेपर्यंत जरा दमाने घेण्याची भावना व्यक्त करत आहे.

महत्वाच्या बातम्या;
दुग्धव्यवसायासाठी डेअरी फार्मचे नियम आहेत फायदेशीर, जाणून घ्या...
शेतकऱ्यांनो शेतीत वापरले जाणारे प्लास्टिक मल्चिंग धोक्याचे, धक्कादायक माहिती आली समोर
शेतकऱ्याचा दिलदारपणा! कर्जबाजारी झाला पण पट्ट्याने फुकटातच कांदा वाटला

English Summary: Early rains on the roots of farmers, onion growers thirteen months of drought
Published on: 16 May 2022, 05:35 IST