पंतप्रधान पिक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असून नैसर्गिक संकटाच्या वेळी झालेल्या पीक नुकसानीत शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळते. परंतु पिक विमा योजनेच्या बाबतीत बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
कारण गेल्या दोन वर्षातील पिक विमा वाटपाची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत की, पिक विमा भरावा की नाही,
अशातच एक नवीन समस्या शेतकऱ्यांसमोर पिक विमा च्या बाबतीत उभी ठाकली आहे. ती समस्या म्हणजे इ पीक पाहणी केली असेल तर तुम्हाला आता पिक विमा मिळणार आहे.
त्यामुळे पीक विमा भरण्याच्या अगोदर इ पीक पाहणी करणे गरजेचे आहे अन्यथा पीक विमा मिळणार नाही. याबाबत आलेल्या शासन जीआर मध्ये नेमकी काय तरतूद करण्यात आली आहे ते आपण समजून घेऊ.
नक्की वाचा:पीएम किसान अपडेट: असेल 'हे' कागदपत्र तरच होईल पीएम किसान मध्ये नवीन नोंदणी, वाचा सविस्तर
शासन निर्णय
1- 1 जुलै 2022 रोजी आलेल्या शासन निर्णयात एक अट टाकण्यात आलेली आहे. कारण आपण पीक विम्याच्या बाबतीत विचार केला तर बरीच प्रकरणे ही बोगस असतात.
अशा प्रकारची बोगस प्रकरणे झाली तर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल करण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे.
नेमके शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असते एक पीक आणि पीक पाहणी साठी दाखवलेले पिक वेगळे असेल आणि यामध्ये तफावत दिसून आली तर तो पिक विमा रद्द केला जातो. याचा अर्थ असा होतो की जे पिक पीक पाहणीत दाखवले असेल त्या पिकाला पीक विमा मिळेल.
2- या जीआर मध्ये आणखी एक मुद्दा मांडण्यात आला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांनी आधी ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे. जर ई पीक पाहणी केली असेल तरच पिक विमा भरता येणार आहे
अशी स्पष्ट तरतूद यामध्ये करण्यात आली आहे . पीक विम्याची नोंद करण्यासाठीच्या मुदतीत वाढ करण्यात आली असून ती आता 30 सप्टेंबर पर्यंत आहे.
नक्की वाचा:शिंदे सरकारचा मोठा निर्णय! लवकरच राज्यात पेट्रोल डिझेल होणार स्वस्त..
Published on: 06 July 2022, 08:22 IST