News

राज्य शासनाच्या ई-पीक पाहणी योजनेला दोन वर्ष झाली आहेत. राज्यात यावर्षी केवळ २६.६१ टक्के क्षेत्रावर ई-पीक पाहणीची नोंद झाली नाही.

Updated on 11 September, 2023 11:23 AM IST

खरीप हंगाम २०२३ ची ई-पीक पाहणी नोंदणी १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत करा, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. २०२३ साठी ई-पीकपाहणी मोबाइल ॲपद्वारे पीकपाहणी नोंदीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर पर्यंत आहे. शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पीकपाहणीची नोंद करावी, असंही सरकारने म्हटले आहे.

पुणे जिल्ह्यातील २५ हजार शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे पिकाची नोंदणी केली आहे. जिल्ह्यातून २४ हजार हेक्टरच्या क्षेत्रफळांची नोंद करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक पाहण्याची नोंदणी करावी लागणार आहे.

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख याबाबत म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास ई-पीकपाहणीची नोंद असताना नुकसान भरपाई अचूक व लवकर मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी करुन घ्यावी.

राज्य शासनाच्या ई-पीक पाहणी योजनेला दोन वर्ष झाली आहेत. राज्यात यावर्षी केवळ २६.६१ टक्के क्षेत्रावर ई-पीक पाहणीची नोंद झाली नाही. प्रकल्पाच्या सुरुवातीच्या वर्षांत ७५ टक्के तर दुसऱ्या वर्षात ९१ टक्के क्षेत्रावर ई-पीक पाहणी झाली होती. या दोन्ही वर्षांच्या तुलनेत यावर्षी आत्तापर्यंत खूपच कमी क्षेत्र नोंदविले गेले आहे.

English Summary: E-Peak inspection registration till 15 October
Published on: 11 September 2023, 11:23 IST