पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन हप्त्यात विभागून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येतात. आजपर्यंत या योजनेचे दहा हप्ते दिले गेले असून आता अकरावा हप्ता जारी करण्यात येणार आहे.
परंतु केंद्र शासनाने या योजनेमध्येबरेच प्रकारचे बदल केले आहेत. यामागे तशी बरीच कारणे देखील आहेत. या योजनेमध्ये बऱ्याच प्रकारचे अनियमितता आली होती. बर्याचदा अपात्र शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घ्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे आता सरकारनेलागणारे कागदपत्र आणि काही नियम बदलले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा नियम म्हणजे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आता 31 मार्चपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचेआहे. अशा प्रकारचे आदेशच सरकारने दिले आहेत.
हे नक्की वाचा:हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा निर्मिती ठरेल एक उत्तम चारानिर्मितीचा पर्याय, वाचा माहिती
ई केवायसी करण्यासाठी येत आहेत अडचणी
केवायसी करताना ग्रामीण भागामध्ये सर्वर ची मोठी समस्या येत आहे. माहिती भरतांना वारंवार सर्वर डाऊन ही समस्या प्रकर्षाने जाणवत आहे. यामध्ये सगळ्यात मोठी समस्या म्हणजे हि ई केवायसी करताना आधार कार्ड ला मोबाईल लिंक असणे बंधनकारक असल्याने अजून शेतकऱ्यांच्या समस्येत भर पडत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ई केवायसी डोक्याला ताप ठरत आहे.पि एम किसान योजनेसाठी पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना मार्च च्या अखेरपर्यंत ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करायचे आहे.
परंतु ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये ग्राहक सेवा केंद्रावर केवायसी प्रमाणीकरण्यासाठी सर्वर नियमित नसतो. त्यात अजून एक भर म्हणजे आधार कार्डला संबंधित शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक लिंक असणे खूपच गरजेचे आहे.
मोबाईल लिंक करायचा असेल म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बर्याचदा आजूबाजूच्या मोठ्या गावात किंवा शहराच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत असल्याने एकंदरीत ई-केवायसीची पूर्तता शेतकऱ्यांसाठी डोक्याला ताप ठरत आहे.
शेतकरी स्वतः करू शकतात ई केवायसी
पी एम किसान निधी योजनेच्या https://pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर असलेल्या फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये किंवा पी एम किसान ॲपच्या माध्यमातून ओटीपी द्वारे लाभार्थींना स्वतः केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येते.
Published on: 19 March 2022, 02:03 IST