News

पंतप्रधान ठिबक सिंचन योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून हि वर्ष 2015 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश आहे की,उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होऊन शेतीला पाण्याची टंचाई भासू नये तसेच होणारा पाण्याचा अपव्यय टाळावा यासाठी ही योजना लागू करण्यात आली होती.

Updated on 16 December, 2021 9:23 AM IST

 पंतप्रधान ठिबक सिंचन योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून हि वर्ष 2015 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश आहे की,उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होऊन शेतीला पाण्याची टंचाई भासू नये तसेच होणारा पाण्याचा अपव्यय टाळावा यासाठी ही योजना लागू करण्यात आली होती.

आता या योजनेचा कालावधी 2025 -26 पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान सिंचन योजनेसाठी केंद्र सरकारने 50 हजार कोटींची तरतूद केली असून जर पिकांसाठी स्प्रिंकलरचा वापर केला तर 80 ते 90 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.. याबाबतचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

 कोण घेऊ शकते या योजनेचा लाभ?

  • ज्या शेतकऱ्यांकडे शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  • वैयक्तिक शेतकऱ्यांवर अतिरिक्त संस्था, शेती गट,सहकारी संस्था, कार्पोरेट कंपन्या, शेतकरी उत्पादक गटांचे सदस्य आणि ते पात्र संस्थांचे सदस्य यांना लाभ मिळेल.
  • या योजनेचा लाभ हा अशा शेतकऱ्यांना होणार आहे जे शेतकरी गेल्या सात वर्षापासून भाडेपट्टी करारांतर्गत शेतजमीन करीत आहेत.
  • जे शेतकरी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शेती करत आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

  • यायुद्धा साठीचा अर्ज महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर करता येतो. त्यासाठी या ऑनलाइन पोर्टल ओपन करायचे आहे.
  • त्यानंतर होम पेज ला अर्ज करा असा टॅग दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर सिंचन साधने सुविधा यावर क्लिक करून समोरील बाबी निवडा हा पर्याय ओपन करायचा आहे.
  • यामध्ये तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव तसेच वैयक्तिक माहिती भरायची आहे.
  • हा रकाना भरल्यानंतर मुख्य घटक मध्ये सिंचन साधने आणि सुविधा हा घटक निवडायचा आहे.
  • यानंतर दिलेली माहिती पूर्ण भरून ज्या पिकासाठी आपल्याला ठिबक सिंचन पाहिजे आहेत याची पूर्ण माहिती भरावी लागणार आहे.
  • तसेच यानंतर पूर्वसंमती शिवाय मी योजनेचा लाभ घेणार नाही अशी नोंद करावी लागणार आहे
  • त्यानंतर तुम्ही भरलेली माहिती सेव्ह करायचे आहे.
  • सेवन केल्यानंतर मुख्य मेन्यूवर जाऊन ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
  • ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही मेनू वर याल. तिथे आल्यानंतर सर्वात प्रथम अर्ज सादर करा यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तालुका हा पर्याय दिसेल त्याशिवाय तुम्ही ज्या साठी अर्ज केला आहे त्या योजनेचे नाव देखील दिसेल.
  • यानंतर प्राधान्य क्रमांक टाकून अटी शर्ती मान्य असल्याचे नमूद करावे लागणार आहे.त्यानंतर अर्ज सादर करावा लागणार आहे
  • त्यानंतर तुम्हाला पूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर तेवीस रुपये 60 पैसे आपल्या अकाउंट मधून भरावे लागणार आहेत. ही प्रक्रिया ऑनलाइन करता येणार आह
English Summary: duration extend of primeminister irrigation scheme till 2025-26
Published on: 16 December 2021, 09:23 IST