News

अवकाळी पावसामुळे ज्या प्रकारे आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे त्याच प्रकारे द्राक्षे फळावर सुद्धा परिणाम झालेला आहे. पाऊसामुळे द्राक्षाचे नुकसान तर झालेच आहे मात्र आता वाढलेल्या थंडीमुळे द्राक्षाची फुगवण सुद्धा पूर्णपणे थांबलेली आहे. दरवर्षी डिसेंम्बर महिन्याच्या अखेरीस बाजारपेठेत जशी द्राक्षे दाखल होतात मात्र यावर्षी अजूनही बाजारात द्राक्षाचा पत्ता नाही. महिनाभर लांबणीवर पडलेल्या द्राक्षामुळे आता दरावर परिणाम होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सांगली जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात द्राक्षाचा हंगाम सुरू होतो जे की हंगाम सुरू होताच मुंबई, कोलकाता, बंगळूर, दिल्ली मधील द्राक्षे व्यापारी तेथे खरेदीसाठी येतात मात्र यंदाची परिस्थिती पाहून व्यापारी अजून शांत आहेत.

Updated on 28 December, 2021 12:23 AM IST

द्राक्ष वेलीवरच कुजली…

यंदा अवकाळी पाऊसामुळे द्राक्षांच्या बागेचे नुकसान झाले आहे त्यामुळे बागेवरच द्राक्षे कुजलेली आहेत. नोव्हेंबर महिन्यात द्राक्षे बाजारात येतात मात्र या परिस्थितीमुळे द्राक्षे बाजारात आलीच नाहीत. वर्षभर जिल्हयातील शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या बागा हाताच्या फोडाप्रमाणे जपल्या आहेत मात्र तोडणी च्या महिन्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्षांच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

व्यापारी अजून आलेच नाहीत...

सांगली जिल्हयात नोव्हेंबर च्या मध्यवर्ती पर्यंत द्राक्षाचा हंगाम सुरू होतो त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील तसेच शेजारच्या राज्यातील व्यापारी वर्ग सुद्धा सांगली जिल्ह्यात दाखल होतो. हंगामाच्या सुरुवातीला ज्यावेळी मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग दाखल होतो त्यावेळी त्यांच्या बोलीतून दर ठरले जातात आणि याचमुळे द्राक्षे उत्पादक वर्गाला दिलासा मिळतो. परंतु अवकाळी पावसामुळे यंदाचा हंगाम उशिरा सुरू होत असल्याने व्यापारी वर्ग दाखल झालेला नाही. जानेवारीच्या मध्यापर्यंत व्यापारी वर्ग दाखल जाईल असा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.

नुकसानीमुळे उत्पादनावर अधिकचा खर्च...

मागील काही दिवसांपूर्वी जो पडलेला अवकाळी पाऊस आहे त्यामुळे बागेवर डाऊनी मिल्ड्यू या रोगाचा प्रादुर्भाव पडला आणि याच थेट परिणाम द्राक्षांच्या घडावर झाला. वेळेत जर यावर उपाययोजना केली नाही तर द्राक्षे तोडून फेकून द्यावी लागतील अशी वेळ शेतकऱ्यांवर येईल. पंढरपूर, सोलापूर तसेच सांगली जिल्ह्यात हे प्रकार घडलेले आहेत. या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तेथील शेतकऱ्यांना प्रति एकर १० हजार रुपयांचा खर्च करावा लागला आहे आणि आता हंगाम लांबला तर याचा दरावर काय परिणाम होईल ते पाहावे लागणार आहे.

English Summary: Due to unseasonal rains, the season of mango fruit has also been extended
Published on: 28 December 2021, 12:23 IST