सद्यस्थितीत निसर्गाच्या लहरीपणामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आपण मागच्या वर्षी पाहिलेस की अतिवृष्टीमुळेशेत पिकांचे अतोनात नुकसान झाले
या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आता सावध भूमिका घेत असल्यामुळे केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.परंतु खरीप हंगामात या पिकांचे नुकसान झाले त्या पिकांचे नुकसान यानंतरही अजूनही विमा कंपन्यांनी वेळेत पैसे अदा केले नाहीत म्हणून शेतकऱ्यांचा रागहाविमा कंपन्यांवर आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विम्याचा दुसरा हप्ता रखडला आहे. हा हप्ता रखने मागे एक वेगळेच कारण असून यामध्ये वाटत होते की विमा कंपन्यांचा मनमानी कारभार असेल परंतु दुसऱ्या हपत्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अजून त्यांच्या वाट्याचा निधी वर्ग केला नसल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे दुसर्या त्याचे पीक विम्याचे 131 कोटी रुपये रखडलेले आहेत. याबाबत विमा कंपन्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे नुकसान होऊन पाच महिने उलटून गेल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना अजूनही भरपाईची प्रतीक्षा आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये पिक विमा हप्ता अदा केल्यानंतर लागलीच अतिवृष्टी आणि सतत पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे विमा कंपनीने नैसर्गिक आपत्ती घटकांमार्फत सात लाख 35 हजार 811 अर्जदारांना 461 कोटी विमा परतावा मंजूर केला होता.
त्यापैकी 73 टक्के नुसार 330 कोटींचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे पण उर्वरित 27 टक्के नुसार 131 कोटींचा विमा हप्ता अद्यापही रखडलेला आहे. या बाबतीत सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Published on: 14 February 2022, 10:13 IST