News

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुणे जिल्ह्यातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. देशातील इतर प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये कांद्याची आवक वाढल्याने पुणे जिल्ह्यातील मंचर एपीएमसी समवेतच राज्यातील अनेक प्रमुख बाजारपेठेत कांद्याच्या भावात घसरण बघायला मिळतं आहे.

Updated on 12 March, 2022 10:59 AM IST

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुणे जिल्ह्यातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. देशातील इतर प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये कांद्याची आवक वाढल्याने पुणे जिल्ह्यातील मंचर एपीएमसी समवेतच राज्यातील अनेक प्रमुख बाजारपेठेत कांद्याच्या भावात घसरण बघायला मिळतं आहे.

गुरुवारी मंचर एपीएमसीमध्ये कांद्याला सतराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला. गुरुवारी मिळालेला बाजार भाव हा आधीच्या लीलावा पेक्षा दोनशे रुपयांनी कमी होता. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. मंचर एपीएमसी पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाची कांद्याची बाजारपेठ आहे. या बाजार समितीतील कांदा राज्यांतर्गत तसेच देशांतर्गत प्रमुख बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविला जातो.

मंचर एपीएमसी म्हणते आठवड्यातून तीन दिवस लिलाव होतो, रविवार गुरुवार आणि मंगळवार या तीन दिवशी या एपीएमसीमध्ये कांद्याचा लिलाव होत असतो. सध्या बाजार समितीत नवीन कांद्याची आवक होत आहे, शेतकरी बांधव कांदा काढणी केल्याबरोबरच बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहेत, त्यामुळे कांदा चांगले वजन देत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा देखील होत आहे.

मात्र, गुरुवारी झालेल्या लिलावात कांद्याचे बाजार भाव 200 रुपये प्रति क्विंटलने खाली आलेत आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असल्याचे चित्र यावेळी बघायला मिळत आहे.

हेही वाचा:-

Pm Kisan Yojna| योजनेसाठी आवश्यक ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना 'ह्या'अडचणीचा करावा लागतोय सामना, शेतकरी पुन्हा सापडला चिंतेत

Agriculture Business| निलगिरीची लागवड करा आणि कमवा बक्कळ नफा; जाणुन घ्या याविषयी महत्वपूर्ण बाबी

पंढरपूरात असं काय घडलं! द्राक्ष बागावर कीटकनाशक फवारणी करताच घड सुकले आणि बाग करपली; बागायतदार सापडले मोठ्या संकटात

English Summary: due to this reasons onion prices decreased learn more about onion prices
Published on: 12 March 2022, 10:59 IST