News

पहिल्यापासूनच कांद्याच्या उत्पादनात असो किंवा कांद्याच्या दरात अथवा कांद्याच्या आवकमध्ये नेहमीचा लहरीपणा आहे. कारण सोलापूरमधील सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे १ हजार ५४ ट्रक कांदा उरातला आहे जो की १ लाख ५ हजार ४०० क्विंटल कांद्याची बाजार समितीत आवक झालेली आहे.आता पर्यंत सर्वात जास्त झालेली कांद्याची आवक याच बाजारपेठेत झालेली आहे, जसे की पहिलीच बाजारपेठ असेल ज्यामध्ये एवढया मोठ्या प्रमाणात कांदा उतरला आहे.कांद्याची मुख्य बाजारपेठ लासलगाव ची मानली जाते मात्र याचा सुद्धा रेकॉर्ड सोलापूर च्या सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीने तोडला आहे. सोलापूरच्या बाजार समितीच्या आवारात कांद्याच्या ट्रकांच्या रांगाचा रांगा लागल्या आहेत.

Updated on 11 January, 2022 8:30 PM IST

यामुळे वाढत आहे कांद्याची आवक :-

सध्या सर्वच भागात खरीप हंगामातील कांद्याची काढणी  सुरू  आहे. कांदा हे नासाडी पीक  असल्याने  त्याची  काढणी करताच  त्याला  बाजारपेठेत  विकावे लागत आहे. बुधवार  पासून सोलापूरमध्ये सिद्धेश्वर यात्रा सुरू होणार असल्याने सिद्धेश्वर कृषी बाजार समितीतील  व्यवहार  बंद  राहणार  असल्याचे सांगितले जात आहे.तर दुसऱ्या बाजूस पाहायला गेले तर अवकाळी पाऊसाचा धोका कायम असल्याने कांद्याची छाटणी झाली की तो लगेच बाजारात विक्रीसाठी आणला जात आहे. कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्याची दोन कारणे म्हणजे व्यवहार बंद आणि अवकाळी पाऊस.

आतापर्यंक सर्वाधिक झालेली आवक :-

राज्यात कांद्याची चर्चा ही आता पर्यंत कांद्याच्या दरावर होत होती मात्र आता सोलापूरच्या बाजार समितीत एवढ्या मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली आहे की राज्यात सर्वत्र याच गोष्टीची चर्चा सुरू आहे.लासलगाव च्या दोन्ही बाजार समितीमध्ये ५१ हजार क्विंटल आवक तर नाशिकच्या बाजारामध्ये ३ हजार २०० क्विंटल कांदा तसेच पुण्याच्या बाजार समितीमध्ये १५ हजार ९०० क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे.लासलगाव च्या बाजार समितीत आताच्या स्थितीपर्यंत ४५ हजार क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे. मात्र सोलापूर च्या सिद्धेश्वर बाजार समितीमध्ये एकाच दिवशी दुपटीने कांद्याची आवक झालेली आहे.

दोन वर्षापूर्वी दरही विक्रमी :-

सोलापूरची बाजार समिती कांद्यासाठी प्रसिद्ध मानली जाते जे की सिद्धेश्वर बाजार समितीत पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा मधील कांदा येत असतो.सध्या बाजारपेठेत खरीप हंगामातील कांद्याची आवक सुरू आहे. बाजारपेठेत लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून सुमारे १७०० रुपये क्विंटल ला दर भेटत आहे. परंतु आता आवक मोठ्या प्रमाणात झाली असल्याने कांद्याचे दर घटणार असल्याचे सांगितले जात आहे. मागील दोन वर्षांमध्ये कांद्याला प्रति क्विंटल २० हजार रुपये दर मिळाला होता जो की आतापर्यंत सर्वाधिक दर होता.

English Summary: Due to these two reasons 1 lakh 5 thousand 400 quintals of onion arrives in Solapur market committee
Published on: 11 January 2022, 08:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)