अनुप्रयास आणि समर्थनम ट्रस्टच्या सहाय्याने भारतातील 30 रेल्वे स्थानकांवर अपंग व्यक्तींसाठी योग्य त्या सुविधा पुरवत ही स्थानके दिव्यांगासाठी सहाय्यकारी रेल्वेस्थानके बनविण्याची योजना स्टॅटर्ड चार्टड बँकेने आखणी आहे. बँकेच्या "सिईग इज बिलीव्हिंग" या पुढाकारातून हा उपक्रम घेण्यात आला असून हा उपक्रम अंधत्व आणि दृष्टीदोष दूर करण्यास मदत करतो.
दृष्टीदोष असणारे, व्हीलचेअर वापरणारे आणि श्रवणास अडचणी असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्र्यपणे आत्मसन्मानाने प्रवास करण्यासाठी बँकेच्या हा नवीन उपक् मदत करत त्यांचे प्रवासासाठी इतरांवरील अवलंबित्व कमी करणार आहे.
बँकेच्या या उपक्रमात दिल्या जाणाऱ्या सुविधा पुढीलप्रमाणेः
-
फलाटांवर तसेच जिन्यांवरही ब्रेल लिपीतील फलक बसविले जाणार असून त्यामुळे त्यांना फलाट क्रमांक आणि अऩ्य सुविधा ओळखण्यास मदत होईल.
-
स्त्री-पुरूष प्रसाधनगृहासारख्या सुविधा ओळखता येण्यासाठी ब्रेल लिपीतील सर्वसाधारण चिन्हे लावली जाणार आहेत.
-
अंधुक नजर असणाऱ्या व्यक्तींसाठी जिन्यांवर परावर्तित पट्या बसविल्या जाणाऱ आहेत.
-
स्थानकांमध्ये ब्रेल नकाशे बसविले जाणार आहेत.
-
चौकशी विभागात ब्रेल लिपीतील माहिती पुस्तिका ठेवल्या जाणार आहेत.
-
स्थानकाविषयीचा व्हिडीओ सांकेतिक भाषेत पाहता येण्यासाठी क्यूआर कोड राहणार
-
दिव्यांग डब्यात प्रवेश करण्यासाठी सरकता रॅम्प आणि व्हिलचेअरची सुविधा दिली जाणार.
ठाणे स्थानकात या सुविधा सर्वप्रथम दिल्या जाणार असून एक एप्रिल 2022 पर्यंत अन्य 30 स्थानकात त्या उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. या प्रकल्पात समावेश करण्यात आलेल्या प्रमुख स्थानकात चेन्नई, वांद्रे, अहमदाबाद, भोपाळ, मथुरा, आग्रा, सिकंदराबाद आणि जयपूर आदींचा समावेश आहे.
भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश असून जवळपास 2.1 कोटी नागरिकांना विविध प्रकारचे अंपगत्व आहे. यातील बहुतांश जण हे गरीब आणि वंचित अशा सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतील आहेत. त्यांना प्रवासासाठी रेल्वेसह सार्वजनिक प्रवास व्यवस्थेवर अवलंबून रहावे लागते. या दिव्यांग व्यक्तींसाठी रेल्वे स्थानक हे प्रवासाचे प्रमुख माध्यम असून दररोज त्यातून ते स्थानिक आणि राष्ट्रीय ठिकाणी प्रवास करतात. अशा व्यक्तींना स्वतंत्र्यपणे प्रवास करता येण्यासाठी या स्थानकात योग्य अशा सुविधा अद्यापही उपलब्ध नाहीत.
बँकेच्या या उपक्रमाबद्दल बोलताना स्टॅडर्ड चार्टड बँकेच्या सस्टेनेबिलिटी विभागाच्या प्रमुख करुणा भाटीया म्हणाल्या, “दिव्यांग व्यक्तींसाठी रेल्वे स्थानक सुविधायुक्त बनविणे ही आमची सर्वसमावेषक संस्था बनण्याकडे सुरु असलेल्या प्रवासातील एक योग्य पाऊल आहे. खरोखर दृश्य बदल घडवून आणत इतरांच्या आयुष्यासाठी उत्तम ब्रॅण्ड या आमच्याच्या आश्वासनपुर्तीसाठी आम्ही सदैव बँकेला अशा स्थितींसाठी पुढाकार घेण्यात अग्रणी ठेवत आहोत आणि हा उपक्रम त्याचेच एक उदाहरण आहे. आम्हाला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा असला तरी हा प्रकल्प आमचा सिईंग ईज बिलिव्हींग पुढाकारांतर्गत असून दिव्यांग व्यक्तींसमोरील अडथळे दूर करत त्यांना सार्वजनिक जीवनात अधिकाधिक प्रवेशाची संधी देण्याच्या आमची दृढता प्रकट करतो.
अनुप्रयासचे संस्थापक पंचम काजला म्हणाले की, समाजातील दिव्यांग व्यक्तींना सहज मिसळता येण्यासाठी आणि समान वागणूक मिळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी सहज प्रवेश ही मुलभूत गरज आहे. दिव्यांग व्यक्तींना सुरक्षितपणे फिरता येण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या आत्मसन्मानाला हातभार लावण्यासाठी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल आम्ही स्टॅडड चार्टर्ड बँकेचे आभार मानतो. समर्थनम ट्रस्टचे व्यवस्थापकीय ट्रस्टी आणि संस्थापक महंतेष जी. के. म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींना 16 राज्यातील 30 रेल्वे स्थानकात सहज प्रवेश मिळण्यासाठी घेण्यात आलेल्या या पुढाकारासाठीआमची सामाजिक संस्था म्हणून निवड केल्याबद्दल आम्ही स्टॅडड चार्टड बँकेचे आभार मानतो. यामुळे दिव्यांग व्यक्तींना सुरक्षित, निर्धोकपणे आणि प्रतिष्ठेने स्वतंत्र्यपणे प्रवास करणे शक्य होणार आहे.
Published on: 20 February 2022, 06:59 IST