दरम्याण स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांनी मध्यस्तीची भुमिका घेत तातडीने प्रश्न मार्गी लावण्यात यावा,अशी मागणी कृषी विभागाकडे केली होती.दरम्याण तालुक्यातील प्रलंबीत प्रतिक्षा यादितील शेतकर्याना पुर्व समंतीचे एस एम एस प्राप्त झाले असल्याने शेतकर्यासह स्वाभिमानी च्या मागणीला यश आले आहे.
शासनाने कृषी योजनांसाठी आॅनलाइन पध्दत सुरु केली आहे.तर अर्ज धारकांची निवड प्रक्रीया कृषी आयुक्त कार्यालयाकडुन करण्यात येत असते तर तालुक्यातील असंख्य शेतकर्यानी अनुदानीत स्प्रिंकलर व ठिंबक संचासाठी महाडीबीटी पोर्टल व्दारे आॅनलाइन अर्ज केले आहेत.परंतु योजना नविन असल्याने यामधे शेतकर्याचा गोंधळ उडत असल्याने ज्यांनी कागदपत्रे अपलोड केले नाही किंवा पूर्वसंमती मिळून सुद्धा साहित्य खरेदी केले नाही.
अथवा बिल अपलोड केले नाही किंवा ज्यांनी अर्ज केले आहेत.परंतु निवडीमध्ये नंबर आला नाही अशा सर्व शेतकरी बांधवांची व विक्रेत्यांची चिखली पंचायत समिती सभागृहामधे ०१सप्टेंबर रोजी कृषी विभागाच्या वतीने बैठक बोलवण्यात आली होती.परंतु महिणे उलटुनही पुर्व समंती न मिळाल्याने शेतकरी आक्रमक होऊन बैठकी दरम्याण गोंधळ झाला होता.याची माहिती शेतकर्यानी स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांना दिली असता सरनाईक यांनी पंचायत समीती सभागृह गाठुन शेतकर्याच्या मागण्या व तक्रारी लेखी स्वरुपात घेण्यात याव्यात,व प्रतिक्षा यादितील शेतकर्याना पुर्वसमंती देण्यात यावी,तक्रारीच्या अनुषंघाने कळवुन वरीष्ठांना प्रस्ताव सादर करण्यात यावा,अशी मागणी लावुन धरली होती.दरम्याण निवड हि आॅनलाइन पध्दतीने होत असल्याने प्रतिक्षा यादितील शेतकर्याचा पुर्व समंती बाबत वरीष्ठांना कळवुन लवकरच तोडगा काढण्यात येईल असे अश्वासन तालुका कृषी अधिकारी व वरीष्ठांकडुन देण्यात आले होते.दरम्याण दि०५सप्टेंबर रोजी सोमठाणा,मुरादपुर,बेराळा,भोगावती,
अंबाशी,पळसखेड,खैरव यासह आदि गावातील शेतकर्याना पुर्व समंतीचे एस एम एस प्राप्त झाले असुन प्रतिक्षा यादितील शेतकर्याचा पुर्व समंती मिळण्याचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लागला असल्याने स्वाभिमानीच्या प्रयत्नाला यश आले आहे.यावेळी स्वाभिमानी चे रविराज टाले,शुभम डुकरे पाटिल,राष्टवादिचे प्रसाद पाटिल,गोदरी ग्रामपंचायत सदस्य गणेश देशमुख,नामदेव ऊसर,योगेश झगरे,बळीराम प्रतापसिंग इंगळे,मंगेश झगरे,मिलिंद जाधव यांच्यासह चिखली तालुक्यातील शेतकरी उपस्थीत होते.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 07 September 2021, 10:51 IST