News

संग्रामपूर : तालुक्यातील कृषी पंपाचे जळालेले ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी १७ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांन सह संग्रामपूर महावितरण कार्यालयात ठीय्या आंदोलन केले होते.

Updated on 22 November, 2021 8:05 PM IST

तालुक्यातील अनेक दिवसांपासून बंद पडलेले ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करा. या मागणीसाठी संग्रामपूर महावितरण कार्यालयात १७ नोव्हेंबर रोजी प्रशांत डिक्कर व शेतकऱ्यांनी सहाय्यक अभियंता एस. बि‌. नवलकर यांच्या दालनात सकाळी ११ वा.पासुन रात्री ९ वाजेपर्यंत ठाण मांडुन बसल्याने महावितरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी त्यां आंदोलनाची दखल घेत. रात्री १०:३० वाजता मुख्य अभियंता डोये अकोला, अधिक्षक अभियंता एस. एम. आकडे बुलडाणा, 

कार्यकारी अभियंता अभिजित जिवनसिंग डिनोरे खामगाव यांनी प्रशांत डिक्कर यांच्या सोबत फोनवर चर्चा करून दोन दिवसात नविन ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याचे आश्वासन दिले.त्यामुळे तुर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले होते. महावितरणने दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करत दि.२१ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सावळा शिवारातील वानखडे डि.पी, निरोड शिवारातील जाधव डि.पी, देऊळगाव शिवारातील म्हसाळ डि.पी., अकोली शिवारातील श्रीधर डि.पी या चारही डि.पी. वरील महावितरणने नविन ट्रान्सफॉर्मर बसवुन दिले.

त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेल्या रब्बी पिकाला जिवनदान मिळाले आहे. अशा संकट समयी आम्हा शेतकऱ्यांना साथ दिली. त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांनी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर, सहाय्यक अभियंता एस बि नवलकर यांचे आभार मानले. यावेळी कॉंग्रेसचे नेते राजुबाप्पु देशमुख, स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष विजय ठाकरे,शाम ठाकरे, विठ्ठल वखारे,अनुप देशमुख, विठ्ठल ताथोड,नयन इंगळे,सुपडा सोनोने,

वैभव मुरुख, मंगेश भटकर, गजानन रावनकार,विशाल चोपडे, विशाल सांवत,गणेश वहितकार,शुभम वखारे,दिलिप वानखडे, रोशन देशमुख यांच्या सह शेतकरी आंदोलनात उपस्थित होते.

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: Due to the agitation of Prashant Dikkar, the farmers got four transformers of agricultural pumps
Published on: 22 November 2021, 08:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)