News

शेतकरी हा देशाचा अन्नदाता म्हणून ओळखला जातो. पण तो आज खरच सुखी आहे का? त्याला त्याच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळत आहे का? देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस कमजोर होत चालली आहे. अधिक उत्पादनासाठी शेतकरी मोठं - मोठ्या कंपन्यांचे रासायनिक औषधं वापरत असतो. परंतु अनेक कारणांवर अंवलबून असलेली शेती कोण- कोणत्या कारणामुळे तोट्याची बनत असते.

Updated on 16 June, 2020 2:50 PM IST


शेतकरी हा देशाचा अन्नदाता म्हणून ओळखला जातो. पण तो आज खरच सुखी आहे का? त्याला त्याच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळत आहे का? देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती  दिवसेंदिवस कमजोर होत चालली आहे. अधिक उत्पादनासाठी शेतकरी मोठं - मोठ्या कंपन्यांचे रासायनिक औषधं वापरत असतो.   परंतु अनेक कारणांवर अंवलबून असलेली शेती कोण- कोणत्या कारणामुळे तोट्याची बनत असते.   कधी पाऊस चांगला होतो तर पिकांवर किड अधिक पडते.   पिकांवर किड कमी असली तर पाण्याची पुरवठा कमी असतो किंवा अजून काही दुसरे संकट शेतकऱ्यांच्या वाट्याला येत असतात. याचाच परिणाम म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्ये वाढ.    शेतकरी शेतीतील सर्वाधिक खर्च हा रासायनिक औषधांवर करत असतो.    यामुळे शेतीसाठी लागणार खर्च वाढत जातो.    पण रासायनिक औषधांचा आणि खतांचा मारा अधिक असल्याने मालाला योग्य भाव मिळत नाही. 

शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्यासाठी एक मार्ग आहे.   तो म्हणजे रासायनिक खते व किटकनाशकाचा वापर टाळावा. त्याऐवजी आपल्या शेतीमध्ये असलेला वनस्पजतीन्य कचरा व शेणाचा उपयोग करुन खत व गोमूत्रापासून किटकनाशक बनवावे.    शेतकऱ्यांना सेंद्रिय खत बनवण्याची माहिती आहे, पण त्याविषयी पुरेशी जागृती नसल्याने बरेच शेतकरी त्याचा वापर करत नाहीत.    गेल्या काही दिवसांपासून शेतीचे चित्र बदलत आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा राज्यातील शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत.   पण सेंद्रिय किटकनाशक व बुरशीनाशक बाबत खुप कमी  शेतकऱ्यांना याची माहिती आहे. त्यामुळे नाईलाजाने त्यांना रासायनिक किटकनाशक व बुरशीनाशक घ्यावे लागतात. यामुळे सेंद्रिय बुरशीनाशक व किटकनाशक कसे तयार करावे याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न करत आहोत.

अमृतपाणी (बुरशीनाशक ) कसे तयार करावे - 

अमृतपानी हे देशी गायीचे शेण, गोमुत्र व गुळ या द्रव्याच्या मिश्रणाने बनविलेले एक गुणकारी पाणी आहे. अमृतपाण्याचा उपयोग सर्व पिकांसाठी गुणकारी आहे. विशेष म्हणजे हे पिकाची रोगप्रतिकारक शक्ति वाढवते व विषारी बुरशीचा नाश करते.

निर्माण विधि :-  वीस लिटर देशी गायीचे गोमुत्र, २० किलो शेण व २५० ग्राम गुळ मिश्रित करुन एखाद्या सीमेंटच्या टाकीत ते  एकजीव करावे.  हे मिश्रण ७-८ दिवस झाकून ठेवावे. एक दिवसाआड काडीने ३-४ वेळा ढवळावे.

उपयोग करण्याची विधि :- २०० लिटर पाण्यात १० लिटर अमृतपाणी घेऊन १ एकर शेतीसाठी पाण्यासोबत दयावे किंवा शिंपडावे.   अमृतपाणी हे ८-९ दिवसांत तयार होते.  तयार झाल्यावर ४ दिवसांत ते वापरावे.

 कीटनियंत्रक तयार करण्याची विधि :-  अडीच किलो कडुनिंबाची पाने व ६५ ग्राम लसुन कुटुन १० लिटर गाईच्या गोमूत्रात मिसळावे.   मिश्रण मातीच्या मडक्यात घेऊन मडके जमिनीत गाडावे व त्यावर झाकण ठेवावे.   २१ दिवसांनी मडके बाहेर काढावे. त्यातील पाने बाहेर काढावे व माठातील गोमुत्र तांब्याच्या भांड्यात किंवा तांब्याची वस्तु भांड्यात घेऊन उकळावे.  १/४ होईपर्यंत उकळावे.  थंड करुन त्याला गाळून पॅक करावे.

उपयोग करण्याची विधि :-

  १ लिटर कीटक नियंत्रक  १०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.    कीटनियंत्रक पेरणीपासून १५ -२० दिवसापर्यंत फवारु नये.  पीक काढणीच्या १ महिन्याअगोदर पासून फवारणी बंद करावी.

दशपर्णी अर्क ( किटकनाशक)

सेंद्रिय शेतीमध्ये कीड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्कला खूप महत्व आहे दशपर्णी अर्क बनवण्यासाठी    कडूनिंब ५ किलो, करंज २ किलो, निरगुडी २ किलो, घाणेरी २ किलो, गुळवेल २ किलो, सीताफळ ३  किलो, रुई २ किलो, पपई  २ किलो, एरंड २ किलो, कन्हेर २ किलो, हे सर्व घटक आणि पाणी २०० लिटर च्या प्लास्टिक ड्रममध्ये टाकावे.   त्यानंतर २ किलो हिरवी मिरची ठेचा, पाव किलो लसून, २ किलो शेण,५ लिटर गोमूत्र व १७० लिटर पाणी टाकावे.  तीस  दिवसापर्यंत दररोज डावीकडून उजवीकडे एका काठीने हे द्रावण ढवळावे ३० दिवसांनी हे द्रावण आंबवल्यावर गाळून फवारणीसाठी वापरावे अशा पद्धतीने तयार केलेला दशपर्णी अर्क आपण ३ महिन्यापर्यंत वापरू शकतो.

किटनियंत्रक व बुरशीनाशक उपयोग करण्याचे फायदे:-

१) हे किटकनाशक, बुरशीनाशक वनस्पतीला पोषक आहे. २)  मनुष्याला हानिकारक नाही. ३) हे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यास खूप फायदेशीर ठरू शकतात.कारण हे तयार करण्यासाठी खूप कमी खर्च लागतो. ४) अमृतपानी व कीटनियंत्रक जमिनीची सुपिकता वाढवतात. व उत्पादनाताही वाढ होते. ५)ही द्रव्ये  प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरले जातात व पिक खराब किंवा त्याला हानी पोहचत नाही.

 

लेखक -

विठ्ठल देवानंद गडाख,  Bsc ( Agri)

9403851658

ऋषिकेश बबन भुसारी,   Bsc ( Agri)

आकाश शेळके,  Bsc ( Agri)

English Summary: due to Organically make fungicides and pesticides farming will cheep ; know the method of pesticides
Published on: 16 June 2020, 02:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)