भारतीय हवामान विभागाने यावेळी मान्सून सामान्य राहील असा अंदाज लावला होता जसे की महाराष्ट्र राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल झाला आहे. जून महिन्यात दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाला पण नंतर पावसाने दांडी मारली परंतु अत्ता पुन्हा एकदा त्याच जोमाने पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. अचानक पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जोराचा झटका बसला आहे.
पेरणी क्षेत्र घटलं -
राज्यामध्ये अनेक भागात पुरेसा पाऊस पडला नसल्याने खरीप हंगामावर परिणाम झाला आहे जसे की मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी ११ टक्के खरीप पिकांची पेरणी कमीच झालेली दिसून येत आहे. मागील आठवड्यामध्ये फक्त ७० टक्के क्षेत्रावर च पेरणी झाली आहे.
कापूस आणि कडधान्यांचं क्षेत्र घटलं -
अनियमित मान्सूनमुळे यावर्षी १५ टक्के कमी कापूस लागवड झालेली आहे तसेच राज्यात तूर, उडीद व मुग या पिकांमध्ये १८ टक्के घट झालेली आहे. अनियमित पावसामुळे लागवड क्षेत्रावर घट झाल्याने कापूस व कडधान्य वर परिणाम होणार आहे.
हेही वाचा:आता आला डिजिटल प्लॅटफॉर्म किसान सारथी, वाढेल शेतकऱ्यांचे उत्पन्न
पीक विमा योजनेस मुदतवाढ -
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतिम तारखेत वाढ करावी अशी मागणी केली होती जे की राज्य सरकारने शेतकऱ्यांचा हा प्रस्ताव मान्य केला व तशीच मागणी पुढे केंद्र सरकारला केली. केंद्र सरकारने सुद्धा ही मागणी मान्य केली आणि अंतिम तारखेमध्ये वाढ केली जे की १५ जुलै ही तारीख होती पण अत्ता शेतकऱ्यांच्या मागणीमुळे २३ जुलै ही अंतिम तारीख ठेवली आहे. तसेच सरकारने या योजनेमध्ये अधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे सुद्धा सांगितले आहे. शेतकरी त्यांचा पीक विमा हप्ता त्यांचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेच्या शाखेमध्ये, प्राथमिक कृषी पतपुरठा व संस्था, पीक विमा पोर्टल आणि आपले सरकार सुविधा केंद्र या ठिकाणी भरू शकतात.
पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम आणि विमा हप्ता रक्कम -
१. भात पिकाचे सरंक्षण विमा ३३ हजार रुपये आहे जे की शेतकऱ्यांना २ टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे. शेतकऱ्यांना या पिकासाठी प्रति एकर ६६० रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे.
२. ज्वारी पिकाचे सरंक्षण विमा १६ हजार रुपये आहे जे की शेतकऱ्यांना २ टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे. शेतकऱ्यांना या पिकासाठी प्रति एकर ३२० रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे.
३. भुईमूग पिकाचे सरंक्षण विमा ३१५०० हजार रुपये आहे जे की शेतकऱ्यांना २ टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे. शेतकऱ्यांना या पिकासाठी प्रति एकर ६३० रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे.
४. सोयाबीन पिकाचे सरंक्षण विमा २६ हजार रुपये आहे जे की शेतकऱ्यांना २ टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे. शेतकऱ्यांना या पिकासाठी प्रति एकर ५२० रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे.
५. मूग व उडीद पिकाचे सरंक्षण विमा २० हजार रुपये आहे जे की शेतकऱ्यांना २ टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे. शेतकऱ्यांना या पिकासाठी प्रति एकर ४०० रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे.
Published on: 19 July 2021, 04:07 IST