सरकारकडून इराणी लसणाची आयात सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे लसणाच्या दरामध्ये पुन्हा एकदा घट झाल्याचं दिसुन येत आहे. म्हणून सरकारच्या आयात धोरणांचा शेतकरी निषेध करत आहेत. काहीच दिवसांपूर्वी टोमॅटो आणि कांद्याच्या दरमध्ये वाढ झाली होती. पण त्याची आयात करुन त्याचे दर घसरवल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान हाच प्रकार सरकार लसणाच्या बाबतीत करत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. सध्या बाजारापेठांमध्ये भारतीय लसणाला समाधानकारक भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकरी करत होते. पण आता बाजारात इराणी आणि चायनावरुन लसूण बाजारपेठांमध्ये दाखल झाल्याने पुन्हा एकदा भारतीय लसणाला भाव मिळणार नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तसेच इराणचा विदेशी लसूण जळगावच्या बाजारपेठांमध्ये दाखल झाल्याने स्थानिक दरात घसरण झाल्याचं व्यापऱ्यांचं म्हणणं आहे.
सध्या जळगाव बाजार समितीमध्ये मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील बाजार समितीमधील या इराणी लसणाची आवाक सुरू आहे. हा लसूण खायला तितका चवदार नसतो पण भारतीय लसणापेक्षा हा कांदा मोठा असतो. त्यामुळे त्याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. शिवाय याचे दरही भारतीय लसणाच्या दराइतकेच असल्याने ग्राहक त्याला पसंती देत आहेत.
Published on: 12 October 2023, 07:09 IST