गेल्या आठवड्यात वर्धा जिह्यात जोरदार पाऊस झाला असल्यामुळे देवळी मतदारसंघातील देवळी तसेच वर्धा, हिंगणघाट या तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. जे की मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे पिके नुकसानग्रस्त झाली आहेत. मोठया प्रमाणावर अतिवृष्टी झाली असल्यामुळे नदी नाल्याचे पाणी शेतीत घुसले आणि पूर्ण शेतीची वाट लागली. एवढेच नाही तर काही नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरले तर काही शेतकऱ्यांची बैलजोडी, जनावरे तसेच शेतीसाठी लागणारी यंत्रणा सुद्धा पाण्यात वाहून गेली.
नुकसानीचे पंचनामे करावेत :-
अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे जे की काही गावामध्ये तर पुराचे पाणी घरात शिरले असल्याने अन्न धान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर आता नागरिकांना राशन पुरवणे गरजचे आहे तसेच कच्चा घरांचे देखील नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान, खरडून गेलेली जमीन, घरात पाणी शिरल्यामुळे झालेले नुकसान आणि वीज व पुरामुळे वाहून गेलेली जनावरे या सर्व नुकसानीचे स्थानिक अधिकाऱ्यांनी पंचनामे करून लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात आई आमदार रणजित कांबळे यांनी सांगितले आहे.
कच्च्या घरांकडे लक्ष द्या :-
ज्या गावात नागरिकांची कच्ची घरी आहेत जे की या घरांचे पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या पावसाच्या धारेमुळे कच्ची घरे खचतात आणि हे घरे पडत नसून क्षत्रिग्रस्त होतात. के की या घराकडे लक्ष देणे गरजेचे हवं कारण मोठया प्रमाणावर या घरांचे नुकसान झाले आहे.
टँकरने पाणीपुरवठा करा :-
की नदीकाठची गावे आहेत त्या पाणीपुरवठा योजना देखील पुराच्या पाण्याच्या वेढ्यात सापडल्या आहेत. पूर कमी झाला असल्यामुळे त्या ठिकाणी गाळ साचून राहिला जे की यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. ज्या गावामध्ये जलकेंद्र शुद्धीकरण नाही अशा गावात टँकर ने पाणी पुरवणे गरजेचे आहे असे आमदार कांबळे यांनी सांगितले आहे. पूर आल्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते, पूल खचल्याची माहिती मिळाली आहे ते त्या ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करावेत असे सांगण्यात आले आहे.
Published on: 17 September 2022, 12:07 IST