गेल्या दोन-तीन दिवसापासून गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यात आतोनात नुकसान झाले. या पावसाने सगळे होत्याचे नव्हते करून टाकले. सगळ्या पिकांचे नुकसान झाले. त्याच्यातच या पावसाने कांद्याची रोपे नेस्तनाबूत केल्यामुळे कांदा लागवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
खरीप हंगाम संपत असताना आता कांद्याच्या लागवडीची लगबग सुरू होते. पावसाळी कांद्याचे तर नुकसान झाले होते परंतु या झालेल्या अति पावसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्यामुळे शेतकरी दोन्ही हंगामाला मुकणार आहेत.
या वर्षी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर समस्यांचा विळखा हा कायम आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे जे कधीही भरून निघणार नाही. त्याच्यातच अजूनही पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने खरीप बरोबरच कांद्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी चाळीतसाठवलेला कांदा सडण्याच्या मार्गावर आहे. बऱ्याच ठिकाणी चाळींमध्ये पाणी शिरल्याने कांदा सडत आहे. दुसरीकडे खरिपातील कांदा लागवडीसाठी टाकलेल्या रोपांची पाऊस आणि पुरामुळे दुरावस्था झालेली आहे.कांद्याची रोपे लागवडीयोग्यन राहिल्याने शेतकऱ्यांनी केलेले कष्ट आणि खर्च वाया गेला आहे.दहा दिवसांवर आलेली कांदा लागवड रोप खराब झाल्यामुळे त्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्याचा विचार केला तर सर्वाधिक पाऊस मराठवाडा झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद, उस्मानाबाद आणि लातूर इत्यादी भागातील रोपवाटिकाचेप्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. कांद्याची रोपे खराब झाल्याने तीलावणी उभे राहिलेले आहेत. तसेच खानदेश मध्येही जळगाव, धुळे, नासिक तसेच सोलापूर या पट्ट्यात ही प्रचंड प्रमाणात कांदा रोपांचे नुकसान झाले आहे. शिवाय एप्रिल पासून साठवून ठेवलेला कांदा ही खराब होत आहे.
Published on: 01 October 2021, 10:08 IST