News

मुंबई- राज्यात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तीय तसेच जीवित हानीला सामोरे जावे लागत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपलं असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून यामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये काही लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.

Updated on 29 September, 2021 11:13 AM IST

मुंबई- राज्यात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तीय तसेच जीवित हानीला सामोरे जावे लागत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपलं असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून यामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये काही लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.

चक्रीवादळाच्या (cyclone impact) प्रभावामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्याला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. मराठवाड्यातही शहरासह ग्रामीण भाग जलमय झाला आहे. शेतातील उभे पिके जमीनदोस्त झाले आहे.  

सोयाबीनसह कांद्याला फटका:

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कांद्याचे पीक धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांनी कांदारोप लागवडीसाठी तयार केले होते. मात्र, या रोपाचेही नुकसान झाले आहे. शेतात पाणी साठल्यामुळे रोपे पिवळी पडली आहेत. भुईमूग, बाजरी, कापूस, पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे.

ना भाव, ना पिक:

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पावसामुळे जमीनदोस्त झाले आहे. सोयाबीन व कांद्यांच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे. शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन रोष व्यक्त केला होता. तर दुसरीकडे पावसाने पिकच हिरावून नेल्यामुळे ना पिक ना भाव अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

वीजबीलाचा शॉक:

कोरोनामुळे लॉकडाउन, भावात कमी आणि आत्ता अतिवृष्टी अशा तिहेरी संकटात राज्यातील शेतकरी सापडला आहे. सध्या वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांना सक्ती केली जात आहे. मात्र, खिशात पैसेच नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांच्या पंचनामासोबत संपूर्ण वीजबिल माफी करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

आदिवासी शेतकरी देशोधडीला:

अतिवृष्टीने आदिवासी पट्ट्यातील सर्व शेत पिके वाया गेली आहेत.त्यामुळे आदिवासी व अन्य शेतकरी देशोधडीला लागले आहेत.तालुक्यातील आदिवासी पट्ट्यामध्ये भात हे मुख्य पीक मानले जाते .भात काढणीचा हंगाम सुरू झाला असून अतिसृष्टीने शेतकऱ्यांची तारांबळ उडवली आहे .

साधारणपणे तालुक्यात हळवे,गरवे व  नीमगरवे अशा तीन प्रकारचे भात इथला आदिवासी शेतकरी लागवड करीत असतो. सुदैवाने टप्प्या-टप्प्याने पडत गेलेल्या पावसामुळे चालू हंगामात भात पिके अपेक्षेपेक्षा चांगले बहरले होते.

 परंतु अतिवृष्टीने खूप मोठे नुकसान भात पिकाचे झाले आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. आले ते पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची जिवाच्या आकांताने धावपळ सुरू आहे. आदिवासी पट्ट्यात सर्वत्र हे विदारक चित्र आहे.पारंपारिक भाताची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने या वाणांची लागवड केली होती.

हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी व नैराश्‍याचे वातावरण आहे पाऊस थांबला नाही तर नुकसानीचे प्रमाण वाढत जाईल.

 

English Summary: due to heavy rain destroy of crop land destroy
Published on: 29 September 2021, 11:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)