News

मागील दोन दिवसापासून पावसाने थोडी उडडिक दिली परंतु मागील काही दिवसात राज्यात पावसाने एवढे थैमान घातले होते की १२ लाख हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्यात गेले होते. सर्वाधिक पावसाने थैमान मराठवाडा विभागात घातल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील शेवटच्या टप्यात निघणारे पीक पावसाने शेतकऱ्यांकडून हिरावून घेतलेले आहे त्यामुळे शेतकरी वर्गाचे आर्थिक बजेट कोसळले आहे. एवढंच काय तर पुढील आठवड्यात हवामान खात्याने पुन्हा एकदा असा ईशारा दिला आहे की राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.

Updated on 11 September, 2021 1:31 PM IST

मागील दोन दिवसापासून पावसाने थोडी उडडिक दिली परंतु मागील काही दिवसात राज्यात पावसाने एवढे थैमान घातले होते की १२ लाख हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्यात गेले होते. सर्वाधिक पावसाने थैमान मराठवाडा विभागात घातल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील शेवटच्या टप्यात निघणारे पीक पावसाने शेतकऱ्यांकडून हिरावून घेतलेले आहे त्यामुळे शेतकरी वर्गाचे आर्थिक बजेट कोसळले आहे. एवढंच काय तर पुढील आठवड्यात हवामान खात्याने पुन्हा एकदा असा ईशारा दिला आहे की राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.

कोरोना संकट आणि आता हे मोठे संकट:

शेतकऱ्यांना(farmer) जास्तीत जास्त उत्पादन खरीप हंगामातील पिकामधून भेटते त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगाम खूप महत्त्वाचा असतो. दरवेळी  निसर्ग आपत्ती मुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. यावर्षी  सुद्धा  खरीप हंगामावर पावसाचा  परिणाम झालेला  आहे. शेतीसाठी  लागणार खर्च दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूला उत्पन्न मात्र घटत च निघाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकरित्या नुकसान सोसावे लागत आहे.या चार दिवस झालेल्या पावसात फक्त पिकाचे नुकसान झाले नाही  तर अनेक  गोष्टींचे  नुकसान झालेले आहे.

हेही वाचा:शेतकरी अडचणीत, उन्हाळी कांद्याच्या दरात मोठी घसरण

मराठवाडा मध्ये झालेल्या पावसामुळे पुराच्या पाण्यात अनेक जनावरे वाहून गेली तसेच जवळपास ३० लोकांचा मृत्यू सुद्धा झाल्याची माहिती दिली.या मुसळधार पावसाचा फटका सर्वात जास्त शेतीला झालेला आहे जे की खरीप हंगामात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी  यावेळी जास्तीच्या भावाने बियाणे खरेदी  केलेली  आहेत. खरीप  हंगामाच्या  सुरवातीस  पाऊसाने  जोरात आगमन केल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा पेरणीचे संकट आले त्यामुळे उत्पादन चांगले निघेल या दृष्टीने खरीप हंगामात सोयाबीन  तसेच मुग आणि उडीद पिकाची लागवड केली.पीक तर शेवटच्या टप्यात येऊन थांबले होते आणि त्याचवेळी पावसाने जोरात धिंगाणा घातला त्यामुळे पिकासोबत फळबागा चे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

30 नागरिकांचा बळी:

चार दिवस झालेल्या मुसळधार पावसाने मराठवाडा सोबतच इतर भागात सुद्धा ३० लोकांचा मृत्यू झालेला आहे असे तेथील स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे.

आता मदतीची प्रतीक्षा:

नुकसान भरपाई साठी शेतकरी वर्ग सध्या कागदपत्रे जुळवत आहे कारण नुकसानीची माहिती देण्यासाठी कागदपत्रांची आवशक्यता असते. त्यामुळे शेतकरी अत्ता मदतीची वाट पाहत आहे.

शेतकऱ्यांवरील टांगती तलवार कायम:

खरीप हंगामातील पीक अगदी शेवटच्या टप्यात असताना पावसाने राज्यात धुमाकुळ घातला त्यामुळे पिकाचे तर नुकसान झाले आहेत. एवढेच काय तर पावसाने कुठेतरी आता उघडीक केली आहे तोपर्यंत पुढच्या आठवड्यात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज लावला असल्याने शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढली आहे.

English Summary: Due to four days of rains, 12 lakh hectares of kharif crop will be in water, Marathwada will have to suffer the most
Published on: 11 September 2021, 01:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)