News

बाजारातील कांद्याची आवक कमी झाल्यानंतर दरात काहीशी सुधारणा दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचे दर पडल्याने शेतकरी अडचणीत आला होता.

Updated on 11 July, 2023 11:12 AM IST

बाजारातील कांद्याची आवक कमी झाल्यानंतर दरात काहीशी सुधारणा दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचे दर पडल्याने शेतकरी अडचणीत आला होता.

कांद्याचे भाव आता उत्पादन खर्चाच्या पातळीवर आल्याचे शेतकरी सांगत आहेत. कांद्याचे भाव आज १ हजार २०० ते १ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होते. पावसामुळे देखील नुकसान झाले होते.

काही राज्यांमध्ये भाव यापेक्षा जास्त आहेत. पण त्या राज्यांमध्ये कांदा उत्पादन कमी होते. परराज्यातून आवक होत असल्याने दर अधिक दिसतात. मात्र शेतकऱ्यांकडे आता जुना कांदा जास्त शिल्लक नाही.

कृषी जागरणचे राष्ट्रीय व्यासपीठ देशातील शेतकऱ्यांचा करणार सन्मान..

पण कांद्याच्या भावातील दरवाढ कायम राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. आता काही दिवसात नवीन कांदा बाजारात येईल.

शेतकरीच नवरा पाहिजे! उच्चशिक्षित नोकरी करणाऱ्या तरूणीचा हट्ट, वडिलांनी अखेर तिची इच्छा केली पूर्ण..

दरम्यान, टोमॅटो खूपच महाग झाला आहे. देशातील बाजारात टोमॅटो आवक खूपच कमी होत आहे. बाजारात आवक सरारीच्या तुलनेत केवळ ३० टक्क्यांपर्यंत होत आहे. मात्र टोमॅटोची मागणी टिकून आहे.

35 रुपयांची घोषणा फक्त कागदावरच? गाईच्या दूधदरात घसरण सुरूच...
४ हजार शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाचा लाभ, शेतकऱ्यांना होतोय फायदा...
टोमॅटोसाठी दुकानदाराने तैनात केले बाउन्सर, सांगितले धक्कादायक कारण

English Summary: Due to decrease in onion arrival, some improvement in price, relief to farmers...
Published on: 11 July 2023, 11:12 IST