News

सध्या उत्तर प्रदेश मध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी आपापला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीने देखील संकल्प पत्र तयार केले असून ते राज्यातील गरीब, शेतकरी आणि तरुणांना अधिक सक्षम करेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले

Updated on 10 February, 2022 1:07 PM IST

सध्या उत्तर प्रदेश मध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी आपापला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीने देखील संकल्प पत्र तयार केले असून ते राज्यातील गरीब, शेतकरी आणि तरुणांना अधिक सक्षम करेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले

.उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आयोजित जन चौपाल मध्ये सहभागी होत मतदारांशी संवाद साधला.एएनआय ने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की नव्या साखर कारखान्यांची उभारणी, जुन्या कारखान्यांचे आधुनिकीकरण  करण्यासाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असून त्याद्वारे मिशन ऊस राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून ऊस उत्पादकांच्या जीवनामध्ये समृद्धी येईल. त्यासोबतच सरदार वल्लभभाई पटेल ऍग्री इन्फ्रास्ट्रक्चर मिशन उत्तर प्रदेशातील सॉर्टिंग आणि ग्रेडिंग युनिट,कोल्ड चेन चेंबर्स, गोदामे आणि प्रक्रिया केंद्राच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मागील पाच वर्षांची तुलना केली तर उत्तर प्रदेशमध्ये इथेनॉलची उत्पादनात वाढ झाली आहे.गेल्या पाच वर्षांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून सुमारे 12 हजार कोटी रुपयांची इथेनॉल खरेदी करण्यात आली असून राज्यात जैवइंधनाचे कारखाने उभारणीस गती आली आहे. उत्तर प्रदेश मध्ये सध्या विधानसभेची निवडणूक येऊ घातली आहे.

आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत असून दिनांक 14, 20, 23 आणि 27 असे पाचटप्प्याचे मतदान पार पडणार आहे दहा मार्च रोजी मतमोजणी होणार असून या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. जर 2017 मधील झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर यामध्ये समाजवादी पक्षाला 47,बसपाला एकोणवीस आणि काँग्रेसला सात जागा मिळाल्या होत्या.

English Summary: due to cane mission to come prosperty life in cane productive farmer says modi
Published on: 10 February 2022, 01:07 IST