आपल्याला माहित आहेस की विदर्भ म्हटले म्हणजे शेतकरी आत्महत्या एक समीकरणाचा डोळ्यासमोर येते. विदर्भामध्ये शेतमालासाठी उपलब्ध नसणारी बाजारपेठ आणि त्यामुळे शेतमालाला योग्य भाव न मिळणे ही प्रमुख कारणे त्यामागे मानली जातात.
विदर्भाची जुनी ओळख आहे. हिवाळ्यात पुसण्यासाठी गडकरी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत.त्याचाच एक भाग म्हणून जेव्हा गडकरी यांच्याकडे जहाजबांधणी खाते होते तेव्हा त्यांनी सिंधी रेल्वे येथे आधी राज्यात इतर चार ठिकाणी ड्रायपोर्ट सुरू करण्याची घोषणा केली होती. परंतु कालांतराने हे काम रखडले पण गडकरी यांनी नोव्हेंबर मध्ये त्यांच्या भूपृष्ठ वाहतूक खात्याच्या अखत्यारीतील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून सिंधी रेल्वे येथील ड्रायपोर्ट मध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी जेएनपीटी सोबत सामंजस्य करार केला.
होऊ घातलेल्या ड्राय पुढचा फायदा हा विदर्भातील शेतकरी उद्योजकांना फार मोठ्या प्रमाणात होणार आहे.शेतकऱ्यांना उद्योजकांना त्यांचा शेतमाल सिंधी येथून देशांतर्गत व परदेशातील बाजारपेठांमध्ये सहजरीत्या पाठविता येणार आहे. लवकरच विदर्भातील कापूस व संत्री हे प्रमुख पिके बांगलादेश ला पाठवण्याचे सूतोवाच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केले.
विदर्भातील प्रमुख पिके संत्री व मोसंबी
विदर्भातील प्रमुख पिके कापूस व संत्रे असून पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन विदर्भातून होते. यासाठी वरूड,मोशी, काटोल आणि नरखेड येथे संत्री पॅकेजिंग व ग्रेडिंगचे13 कारखाने सुरू करण्यात आले आहेत. तसेच विदर्भात उत्पादित झालेला संत्री रेल्वेद्वारे सुद्धा बाहेर नेण्यासाठी सोय करण्यात आली आहे. सिंधी रेल्वे येथील लॉजिस्टिक पार्क सुरू झाल्यावर विदर्भातील कापूस व संत्री बांगलादेश व इतर देशात पाठविणे सोयीचे होईल असे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले.
तसेच अकोट येथील केळी, मूर्तिजापूर येथील सिताफळ मुंबई व इतर राज्यात पाठवत आहेत.
लॉजिस्टिक पार्क चे स्वरूप
सिंधी येथे तीनशे चाळीस एकर जागेवर ड्रायपोर्ट चार होणार असून यासाठी भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणाहून समृद्धी महामार्ग तसेच नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग जवळ असून रेल्वेची ही सुविधा आहे.तसेच एयर कंडीशनर कंटेनर असलेल्या रेल्वेची सुविधा येथून आहे.
Published on: 23 December 2021, 11:55 IST