खरीप हंगामात आलेल्या अवकाळी पावसामुळे जवळपास सर्वच पिकांचे नुकसान झाले होते, निदान या नूतन वर्षात तरी वरुणराजा अवेळी बरसणार नाही अशी शेतकऱ्यांना अशा होती, मात्र शेतकऱ्यांची ही आशा फोल ठरली असून नववर्षाच्या सुरुवातीलाच अवकाळी पाऊस व गारपिटीने संपूर्ण राज्यात त्राहिमाम् माजवला आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे तसेच त्यामुळे वातावरणात झालेला प्रतिकूल बदल यामुळे शेवगा पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र नजरेस पडत आहे. शेवगा पिकाला अवेळी आलेल्या पावसाचा मोठा फटका बसला असून उत्पादनात कमालीची घट नमूद करण्यात आले आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते या हंगामात शेवगा पिकाच्या उत्पादनात जवळपास 35 टक्के घट झाली असेल आणि यामुळेच मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने शेवगा पूर्ण कडाडला असून त्याला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव प्राप्त होत आहे.
परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की, शेवगा बाजारात नजरेस देखिल पडत नाहीये, तसेच ज्या ठिकाणी शेवगा उपलब्ध आहे किती शेवग्याचा दर्जा कमालीचा ढासळलेला आहे. सध्या शेवग्याला बाजारपेठेत साठ ते शंभर रुपये प्रति किलो बाजार भाव मिळत आहे, या बाजार भावात मागच्या आठवड्यापेक्षा 30 रुपये किलोने घट नमूद करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देखील शेवग्याचे यशस्वी उत्पादन घेतले जाते, मात्र या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात शेवग्याच्या उत्पादनात घट नमूद करण्यात आले आहे त्यामुळे जिल्ह्यात शेवगा हा चांगलाच भाव खाताना दिसत आहे.
एका महिन्यापूर्वी शेवग्याचे दर हे जेमतेमच होते, मात्र गेल्या महिन्याभरापासून शेवग्याच्या दरांनी चांगलीच मुसंडी मारली आहे. सध्या शेवग्याला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव प्राप्त होत आहे, शेवगा बाजारपेठेत दोनशे रुपये किलोने विक्री होत आहे. दोन आठवड्यापुर्वी शेवग्याचे दर असेच कायम होते. किरकोळ बाजारात शेवग्याची एक शेंग चक्क तीस रुपयापर्यंत विक्री केली जात होती. असे असले तरी, शेवगा बाजारपेठेत नजरेला पडत नव्हता. उत्पादनात घट झाली असल्याने शेवग्याला विक्रमी बाजार भाव प्राप्त होत असल्याचे सांगितले जात आहे.
मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे व त्यानंतर तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे तसेच वारंवार पडत असलेल्या दाट धुक्यामुळे शेवग्याच्या पिकावर प्रतिकूल परिणाम बघायला मिळाला आहे. शेवग्याचे पीक फुलोरा अवस्थेत असताना सतत वातावरण बदलत होते त्यामुळे शेवग्याच्या पिकावर पाहिजे तेवढी फळधारणा झाली नाही, अनेक ठिकाणी शेवग्याच्या पिकावर फळधारणा झाली पण खूपच कमी प्रमाणात झाली वत्याचा दर्जा देखील पाहिजे तसा चांगला नव्हता, फळधारणा चांगली झाली नाही म्हणून उत्पादनात घट घडून आली. आणि त्यामुळेच आज रोजी शेवगा बाजारपेठेत बघायला देखिल मिळत नाही.
Published on: 22 January 2022, 06:29 IST