शेवग्याची दरवाढ झाली असून औरंगाबाद येथे शेवग्याच्या शेंगांना चारशे रुपयांपर्यंत विक्रमी दर मिळाला आहे. परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये परिस्थिती वेगळी असून नाशिक जिल्ह्यामध्ये मालाची प्रतवारी नुसार शेतातून शेवगाच्या शेंगाची खरेदी होत असून शेवग्याच्या शेंगांना 130 ते 180 रुपये किलोने भाव मिळत आहे.
या परिस्थितीमध्ये शेवगा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की व्यापारी हे चांगलेच यामध्ये नफेखोरी करीत आहेत. परंतु हे आक्षेप तथ्यहीन असून शेवग्याच्या तुटवड्यामुळे यंदा इतका दर मिळाल्याचा दावा व्यापारी वर्गासह बाजार समितीकडून केला जात आहे.
नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील कमी पावसाच्या क्षेत्रात शेवग्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यामध्ये कसमादे पट्टा आघाडीवर असून कमी पाण्यात येणारे शेवगा पीक या परिसरात जास्त घेतले जाते. शेवगा हे पीक कमी पाण्यात येणारे आहे तसेच त्याचे वर्षातून दोनदा उत्पादन मिळते.
जर मालेगाव तालुक्याचा विचार केला तर शुक्रवारी जागेवर शेवग्याला 170 ते 180 रुपये भाव मिळाला. धुके आणि दमट वातावरणामुळे शेवग्याची शेंग लालसर पडते. चा दर्जा खालावलेल्या मालासकमी भाव मिळणे समजण्यासारखे आहे. परंतु उत्पादक आणि ग्राहक यामध्ये व्यापारी किलोमागे 50 ते 100 रुपये नफा मिळवतात याकडे मालेगाव तालुक्यातील शेतकरी मनोहर खैरनार यांनी लक्ष वेधले. यावर व्यापारी राजू अहिरे यांनी शेवगा उत्पादक शेतकऱ्यांचे आक्षेप खोडून काढले.मुळात शेवग्याची मुख्य बाजारपेठ मुंबई असून वाशी बाजार समितीतून विदेशासह देशातील बाजारात मला पाठवला जातो. हंगामाच्या सुरुवातीला आम्ही 250 ते 260 रुपये किलोने थेट शेतातून शेवग्याची खरेदी केली होती.
शेवग्याची आवक वाढल्यानंतर भाव कमी झाले आता माल कमी होऊ लागल्याने ते पुन्हा वधारले असे त्यांनी सांगितले. तसेच नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात फुलोरा अवस्थेत असताना अवकाळी चा शेवग्याला चांगलाच फटका बसला.त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे.शेवग्याच्या तुटवड्यामुळे यावेळी आजवर कधी नव्हे इतका दरशेवग्याला मिळत आहे असे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भटूजाधव यांनी स्पष्ट केले.(संदर्भ-लोकसत्ता)
Published on: 22 January 2022, 05:48 IST