मागील तीन वर्षांपासून कोकण मधील शेतकरी बांधवांना कोणत्या न कोणत्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होत आहे तसेच याचा परिणाम फळबागांवर सुद्धा होत आहे. अवकाळी पाऊस असो किंवा अतिवृष्टी तसेच किडीचा प्रादुर्भाव असो यावर तोडगा काढण्यासाठी आता ड्रोन चा वापर केला जाणार आहे. कोकण विभागातील परिस्थिती लक्षात घेता अत्याधुनिक तंत्रज्ञान चा पहिला मान कोकणातील शेतकऱ्यांना भेटणार आहे. शिवाय जानेवारी महिन्यापासून तेथील शेतकरी वर्गाला प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे त्यामध्ये हे यंत्र कसे वापरायचे याचे शिक्षण दिले जाणार आहे.
वेळेत होणार कीडीचे व्यवस्थापन
ड्रोन च्या माध्यमातून आता किडीवर नियंत्रण ठेवणे फायदेशीर पडणार आहे तसेच कमी खर्च आणि कमी वेळात काम होईल. पिकांवरील कीड व रोगाचा बंदोबस्त अगदी सहजपणे रोखता येणार आहे. कोकन विभागात मोठ्या प्रमाणात फळबागांचे क्षेत्र आहेत जे की पाऊस पडल्यानंतर लगेच बागांवर किडीचा प्रादुर्भाव पडतो मात्र त्याचे नियंत्रण कसे करायचे ते लगेच निदर्शनास येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आता यासाठी फायदेशीर ठरणार आहे. यामध्ये ज्या सुविधा आहेत ज्याने कोणत्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव पडला आहे ते लक्षात येईल.
या दोन ठिकाणी होणार प्रशिक्षण
आता ड्रोन च्या माध्यमातून फवारणी करायची म्हणल्यावर ते कसे करायचे यासाठी प्रशिक्षण लागणार आहे. जानेवारी महिन्यापासून रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्ये तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील कृषी केंद्रामध्ये शेतकऱ्याना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात ड्रोन ची सर्व माहिती जे की कसे वापरायचे पासून सर्व बाबी शिकवल्या जाणार आहेत. या प्रशिक्षणात शेतीसाठी ड्रोनचा वापर किती महत्वाचा आहे ते शेतकऱ्यांना समजणार आहे.
काय आहेत कृषी मंत्रालयाचे निर्देश?
ड्रोनमध्ये कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी मोठी क्षमता आहे मात्र पिकांचे संगोपन व्हावे जे की त्यावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाही याची काळजी कृषी मंत्रालय घेत आहे. पिक फवारणी क्षेत्र, वजनाची मर्यादा, फ्लाय क्लिअरन्स, सुरक्षा विमा तसेच नोंदणी इ. सर्व बाबींचा उल्लेख करून नियमावली तयार करण्यात आली आहे. या प्रशिक्षणात ड्रोन उडवताना तसेच खाली उतरवताना कशी काळजी घ्यायची ते सांगितले जाणार आहे.
Published on: 30 December 2021, 11:12 IST