News

काही दिवसांपूर्वी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघात निधन झाले. यामुळे अनेकांनी दुःख व्यक्त केले. असे असताना अनेकांनी त्यांच्या अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मुख्यमंत्र्यानी चौकशीचे आदेश देखील याबाबत दिले आहे. आज अधिवेशनाचा (monsoon session) तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी या अपघातावर विधानभवनात चर्चा झाली.

Updated on 22 August, 2022 3:44 PM IST

काही दिवसांपूर्वी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघात निधन झाले. यामुळे अनेकांनी दुःख व्यक्त केले. असे असताना अनेकांनी त्यांच्या अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मुख्यमंत्र्यानी चौकशीचे आदेश देखील याबाबत दिले आहे. आज अधिवेशनाचा (monsoon session) तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी या अपघातावर विधानभवनात चर्चा झाली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. ड्रायव्हर सातत्याने जबाब बदलतो त्यामुळे मेटेंच्या अपघाताबाबत शंका उपस्थित होते, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. यामुळे आता चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार म्हणाले, या संंदर्भात मला मेटे यांच्या पत्नीचा देखील फोन आला होता. यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे सांगितल्याचे अजित पवार म्हणाले.

पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे का? तपासात काही चालढकल होत आहे का? अपघाताची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे का? असे अजित पवार यांनी सांगितले. बऱ्याचदा असे होते की, अपघात कोणत्या क्षेत्रात झाला ते आपले क्षेत्र नाही म्हणून पोलीस वेळेवर पोहोचत नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

टोळ्यांनी फसवलं!! ऊसतोड कामगारांकडून तब्बल 39 कोटी रुपयांची फसवणूक, धक्कादायक आकडेवारी आली समोर

दरम्यान, दुसरीकडे मेटे यांच्या चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर त्यांच्या चालकाला योग्य लोकेशन सांगता आले नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यामुळे आता चौकशीत काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांना एक तास मदत न मिळाल्याने याबाबत शंका अजूनच गडद होत आहे.

महत्वाच्या बातम्या;
'खाऊन 50 खोके माजलेत बोके, ईडी ज्याच्या दारी तो भाजपच्या दारी'
ब्रेकिंग! महाराष्ट्रातल्या भाजपच्या माजी खासदाराचा आपमध्ये प्रवेश, केजरीवाल यांचे मिशन महाराष्ट्र सुरू
शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या जिल्हा बँका राज्य बँकेत विलीन होणार? मोदी सरकारचा निर्णय

English Summary: driver constantly changing answer, Ajit Pawar expressed doubts Mete accident
Published on: 22 August 2022, 03:44 IST