News

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका स्वप्नामुळे शेतकरी प्रत्यक्षात जखमी झाला आहे. आपण बकरा कापत असल्याचे स्वप्न शेतकऱ्याला पडले. मात्र प्रत्यक्षात त्याने स्वत:चे गुप्तांग कापले आहे. यामुळे हा शेतकरी रक्तबंबाळ झाला आहे.

Updated on 23 August, 2022 7:15 PM IST

अनेकदा आपल्या स्वप्नात अनेक गोष्टी येतात. आपल्याकडे पैसे येतात, आपण श्रीमंत होतो, तसेच आपण स्वप्नात काहीतरी बडबडत असतो. हे आपण ऐकले आहे आणि अनुभवले देखील आहे. असे असताना मात्र पश्चिम आफ्रिकेत असलेल्या घाना देशातील एका शेतकऱ्यासोबत भीषण प्रकार घडला आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका स्वप्नामुळे शेतकरी प्रत्यक्षात जखमी झाला आहे. आपण बकरा कापत असल्याचे स्वप्न शेतकऱ्याला पडले. मात्र प्रत्यक्षात त्याने स्वत:चे गुप्तांग कापले आहे. यामुळे हा शेतकरी रक्तबंबाळ झाला आहे.

या घटनेनंतर या शेतकऱ्यांला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मी खुर्चीत बसलो होतो. त्यावेळी मला झोप लागली. माझ्या समोर बकरा आहे आणि तो मी कापतोय, असे स्वप्न मला पडले, असे या शेतकऱ्यांने म्हटले आहे. कोफी अट्टा असे शेतकऱ्याचे नाव आहे.

शिंदे-फडणवीस सरकारची राज्यपाल नियुक्त १२ नावांची यादी समोर, वाचा कोणाची लागणार वर्णी?

कोफी स्वप्न पाहत असताना त्याच्या शेजारीच एक चाकू होता. बकरा कापत असल्याचे स्वप्न पाहता पाहता कोफीने बाजूलाच असलेला चाकू हाती घेतला. याच चाकूमुळे कोफीच्या गुप्तांगाला इजा झाली. यामुळे तो रक्तबंबाळ झाला.

'शहाजीबापू पाटील यांच्यामुळे त्यांच्या भावावर गळफास लावून आत्महत्या करण्याची वेळ आली'

दरम्यान, त्याने गुप्तांगासोबत वृषणाची पिशवीदेखील कापली आहे. यावेळी त्याची पत्नी घरात नव्हती. घरी परतल्यावर तिला घडलेला प्रकार समजला. तिला मोठा धक्का बसला. कोफीची अवस्था पाहून डॉक्टरांना देखील धक्का बसला.

महत्वाच्या बातम्या;
अखेर शिंदे सरकारमध्ये २ महिलांना मिळणार स्थान, पुणे जिल्ह्यातून 'या' महिला नेत्याची लागणार वर्णी..
शिंदे सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! 50 हजार, पूरग्रस्तांना मदतीसह केल्या अनेक घोषणा
मोठी बातमी! आता 'या' वाहनांमध्ये CNG आणि LPG किट लावा, केंद्राने दिली परवानगी..

English Summary: dream slaughtering goat dream cutting off one's private parts, farmer
Published on: 23 August 2022, 07:15 IST