News

शेतकरी म्हटले की अलीकडे एका वेगळ्याच नजरेने बघितले जाते. त्यांच्यावर कधी चांगले दिवस येतील आणि कधी वाईट दिवस येतील हे कोणीही सांगू शकत नाही. असे असताना मात्र अशी काही पिके आहेत ज्यामधून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू शकतात.

Updated on 15 January, 2022 11:55 AM IST

शेतकरी म्हटले की अलीकडे एका वेगळ्याच नजरेने बघितले जाते. त्यांच्यावर कधी चांगले दिवस येतील आणि कधी वाईट दिवस येतील हे कोणीही सांगू शकत नाही. असे असताना मात्र अशी काही पिके आहेत ज्यामधून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू शकतात. यामध्ये आता ड्रॅगन फ्रुट हे पीक हमखास पैसे मिळवून देणारे पीक आहे. यामधून शेतकरी मालामाल होऊ शकतो. हे फळ विविध आजारांवर गुणकारी ठरत असल्याचे पुढे आल्यानंतर याबाबत अनेकांनी माहिती घेऊन याची लागवड अनेकांनी केली आहे. तसेच अनेकांनी यामधून बक्कळ पैसा देखील कमवला आहे.

सध्या बाजारात ड्रॅगन फ्रुटची किंमत 200 ते 250 रुपये प्रति किलोपर्यंत आहे. यामध्ये हा दर कमीजास्त होतो. मात्र या दरात फारसा बदल होत नाही. यातून तुम्ही भरपूर कमाई करू शकता. ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो, त्या ठिकाणी सुद्धा हे फळ चांगले वाढते. सुरुवातीला थोडे पैसे गुंतवले की नंतर याला फारसा खर्च नाही. लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षापासूनच ड्रॅगन फ्रुटची फळे मिळण्यास सुरुवात होते. मे-जून महिन्यात याला फुले येतात, आणि डिसेंबर महिन्यात फळे येतात. या फळांसाठी थंडी पोषक असते.

याच्या एका झाडाला जास्तीक जास्त ५० फळे येतात. यामध्ये चांगले पैसे मिळत असल्याने अशी काही उदाहरणे आहेत की जे चांगल्या पगाराची नोकरी सोडून याची शेती करत आहेत. जर एका एकराचा विचार केला तर दरवर्षी आठ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. मात्र, त्यासाठी सुरुवातीच्या काळात चार-पाच लाख रुपयांची गुंतवणुक करावी लागते. मात्र नंतर यामधून आपल्याला हमखास पैसे मिळू शकतात.

याची लागवड करताना दोन ड्रॅगन फ्रुट रोपांमधील अंतर दोन मीटर असावे. या झाडांना लाकडी किंवा लोखंडी काठीचा आधार देत वाढण्यास मदत करू शकता. यासाठीच मोठा खर्च येतो. ड्रॅगन फ्रुटचा वापर जॅम, आईस्क्रीम, जेली उत्पादन, फळांचा रस, वाइन इत्यादींमध्ये केला जातो. फेस पॅक मध्ये ते वापरले जाते. त्यामुळे त्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. ड्रॅगन फ्रुटची लागवड केल्यानंतर एका हंगामात किमान तीन वेळा फळ येते. तसेच याला फारशी औषधे देखील लागत नाहीत. यामुळे इतर पारंपरिक पिकांना बगल देत हा एक चांगला पर्याय आपल्यासमोर आहे.

English Summary: Dragon fruit is a boon for farmers! Since we are getting special money, farmers' goods, know ...
Published on: 12 January 2022, 05:47 IST