समाजातील अनुसूचीत जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने घरगुती ग्राहकांसाठी वीजजोडणीत प्राधान्य देण्यासाठी महावितरणने बुधवारी म्हणजे 14 तारखेपासून सहा डिसेंबरपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी बोलताना डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना राबविण्याचा निर्णय जाहीर केला. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे जगभरात बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील व्यक्तींच्या जीवनात प्रकाश आणण्याच्या दृष्टीने वीज जोडणी कार्यक्रम बाबासाहेबांची जयंती ते पुण्यतिथी या कालावधीत राबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
-
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अर्जदाराने सक्षम प्राधिकारी यांनी प्राधिकृत केलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करावे.
-
वीज जोडणी करता लागणारा विहित नमुन्यातील अर्ज.
-
ऍड्रेस प्रूफ साठी आधार कार्ड, रहीवाशी पुरावा साठी रहिवासी दाखला आदी कागदपत्रे सादर करावी.
-
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अर्जदारांनी महावितरणच्या विहित नमुन्यात कागदपत्रांचा ऑनलाइन की आता ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
-
शासनमान्य विद्युत कंत्राटदाराकडून विज मांडणीचा टेस्ट रिपोर्ट अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
-
लाभार्थ्यांनी अर्ज करताना पाचशे रुपये अनामत रक्कम महावितरण कडे जमा करणे आवश्यक राहील.
-
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, संबंधित लाभार्थी अर्जदार हा विज जोडणी साठी अर्ज केल्याच्या ठिकाणी पूर्वी थकबाकीदार नसावा.
Published on: 16 April 2021, 09:58 IST